Next
हसा हसवा
पुरुषोत्तम अत्रे
Friday, July 26 | 03:30 PM
15 0 0
Share this story


अंगदुखी
गजू एकदा डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला,
“डॉक्टरसाहेब, सगळं अंग दुखतंय.”
मग त्यानं आधी हातावर, मग छातीवर, मग डोक्यावर, मग पोटावर आणि पायावर बोट दाबून दाखवले आणि दरवेळी अंगावर बोट टेकलं की तो म्हणत होता, इथे दुखतंय... इथे दुखतंय... इथे दुखतंय आणि इथेही दुखतंय... सगळं अंग दुखतं डॉक्टरसाहेब...
डॉक्टरांनी त्याला पेनकिलर दिली आणि घरी पाठवलं.
दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तीच तक्रार घेऊन आला तेव्हा मात्र डॉक्टरांनी त्याची नीट तपासणी केली आणि त्याला सांगितलं,
“गजूशेठ, तुमचं अंग दुखत नाही, तुमचं बोट कापलं आहे. त्यावर इलाज केला पाहिजे.”
म्हणूनच
अमेरिकेतील एक धनाढ्य उद्योगपती रॉकफेलर एका हॉटेलमध्ये गेले आणि तेथे ते स्वस्त खोल्यांची चौकशी करत होते. हॉटेलच्या मालकानं त्यांना ओळखलं. तो त्यांना म्हणाला,
“अहो, तुमच्या कंपनीतील साधा कारकूनही महागड्या खोल्यांमध्ये येऊन राहतात आणि तुम्ही मालक असूनही...”
त्यावर रॉकफेलर लागलीच म्हणाले,
“म्हणूनच तर ते कारकून राहिले आहेत...”

कामाची अदलाबदल

ही कथा आहे चौदावा लुई याच्या दरबारातील एका सरदाराची. तो एकदा पत्नीच्या शयनगृहात गेला तेव्हा त्याची पत्नी एका धर्मगुरूच्या मिठीत असलेली दिसली. त्यावर अत्यंत थंडपणानं तो खिडकीजवळ गेला आणि हात बाहेर काढून रस्त्यावरील लोकांना आशीर्वाद देऊ लागला.
“हे काय चाललंय तुमचं?” त्याच्या बायकोनं उद्विग्न होऊन त्याला विचारलं.
तो म्हणला, “हे धर्मगुरू माझं काम करताहेत. तेव्हा मी त्यांचं काम का करू नये?”


अंदाज
“दोस्त, माझा अंदाज इतका परफेक्ट म्हणून तुला सांगू... आता काही वेळापूर्वी मी स्टेशनला वाइन शॉपमधून दोन कॉर्टर  घेऊन निघालो होतो. मनात विचार आला, चुकून आपण घसरून पडलो तर दोन्ही बॉटल फुटतील आणि पैसे पाण्यात जातील. मग मी काय केलं, डोकं चालवलं... दोन्ही बॉटल तिथेच पिऊन टाकल्या आणि तुला सांगतो मला वाटलं होतं तसंच घडलं. अरे, घरी येईपर्यंत सात वेळा पडलो... सात वेळा...”
आमचा शेजारी त्या दिवशी मला आपली हुशारी सांगत होता.
मार्क ट्वेनची वचने
मार्क ट्वेन हा पाश्चात्त्य देशातील एक मोठा विनोदी लेखक. त्याची पुढील काही वचने चांगलीच विनोदी आहेत:
1. अभिजात पुस्तकं म्हणजे अशी पुस्तकं लोक ज्याचे कौतुक करतात, पण ती कधी वाचली जात नाहीत.
2. आरोग्याविषयी पुस्तक वाचताना शुद्धलेखनाच्या चुकांकडे बारकाईनं लक्ष ठेवा. तसं न केल्यास तुमचा जीव जाऊ शकतो.
3. बोलून खातरजमा करून देण्यापेक्षा न बोलून मूर्ख समजलं जाणं चांगलं.
4. जमीन खरेदी करून ठेवा, कारण आता निर्मिती थांबली आहे.
5. तुमच्या शिक्षणात तुमच्या शाळेला हस्तक्षेप करू देऊ नका.
6. जर आपण ८० वर्षाचे जन्माला आलो असतो आणि हळूहळू १८ वर्षांपर्यंत वाढलो असतो तर जीवन केवढं सुंदर झालं असतं, नाही का?
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link