Next
कुजबूज
प्रतिनिधी
Friday, May 10 | 03:15 PM
15 0 0
Share this story


स्टारबक्स कॉफी विथ जीओटी!
शीर्षकाचा अर्थ कॉफी पीत जीओटी बघायचं असा मुळीच नाही हं! ही चर्चा आहे ती गेम ऑफ थ्रोन्सच्या आठव्या पर्वाच्या चौथ्या भागात दिसलेल्या स्टारबक्सच्या टेकअवे कॉफी मगची! 'द लास्ट ऑफ द स्टार्क्स' या भागात विंटरफॉलचं युद्ध जिंकल्यानंतरच्या जल्लोषावेळच्या दृश्यादरम्यान, टेबलवर हा कॉफीचा मग दिसत आहे. ही चूक लक्षात येताच प्रेक्षकांनी जीओटीच्या ह्या दृश्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. जीओटीच्या काही भागांमध्ये पात्र धातूच्या पेल्यातून मद्यपान करताना दाखवली गेली होती. काल्पनिक कथानकावर आधारलेल्या या मालिकेचा कालखंड हा अगदी जुना आहे. किंबहुना याच कालखंडाच्या अविश्वसनीय दुनियेची प्रेक्षकांना भुरळ होती. या कालखंडात आधुनिक काळातील कॉफीचा टेकअवे डिलिव्हरी मग दिसतो ही अशक्य गोष्ट! दृश्य एडिट न करता दाखविल्यामुळे चाहत्यांनी जीओटीवर टीकेचा भडीमारही केला. मात्र इतकं तंत्रज्ञान वापरताना ही खरंच चूक आहे की प्रसिद्धीचा एक भाग, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.


मानुषीचं बॉलिवूड पदार्पण!
मिस वर्ल्ड या सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी मानुषी छिल्लर पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण कोणतं फोटोशूट किंवा तिची एखादी सोशल मीडिया पोस्ट नसून, करिअरला मिळालेलं एक महत्त्वाचं वळण आहे. मॉडेलिंगविश्वात प्रसिद्धीझोतात आलेली आणि मिस वर्ल्डचा किताब मिळवणारी मानुषी अखेर हिंदी कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनकथेवर येणाऱ्या बायोपिकद्वारे मानुषी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. यांत अक्षयकुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून मानुषी राजकुमारी संयुक्ता साकारणार आहे.


चर्चा प्रियांकाच्या लूकची !
‘कॅम्प : नोट्स ऑन फॅशन’ या थीमवर आधारित ‘मेट गाला २०१९’ च्या पिंक कार्पेटवर प्रियांका आणि निक यांनी एकत्र हजेरी लावली. सॉफ्ट पेस्टल रंगाच्या गाऊनमध्ये प्रियांंंका कमालीची सुंदर दिसत होती. परंतु या गाऊनसोबत प्रियंकानं कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्रियांकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली होती. यावर एक क्राऊनही चढवला होता. ‘मेट गाला’च्या यंदाच्या थीमनुसार प्रियांकाचा हा लूक एकदम एकदम साजेसा होता. मात्र देसी गर्लचा हा लूक अनेकांना रुचला नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link