Next
काही हटके अॅप्स
अमृता दुर्वे
Friday, October 04 | 05:00 PM
15 0 0
Share this story

फोनवरची अॅप्स म्हटलं की प्रत्येकाचं काहीतरी विशिष्ट उद्दिष्ट असतं. म्हणजे चॅटिंग, गेमिंग, टाइमपास, सोशल मीडिया. 

पण काही अॅप्स अशी आहेत जी फार गरजेची नाहीत, पण फोनवर असली तर उपयोगाची मात्र आहेत. अशी काही अॅप्स बघूया- 


Wunderlist - तुम्हाला जर रोजच्या कामांची, विकत घ्यायच्या वस्तूंची यादी करायची सवय असेल तर मग हे अॅप तुम्हाला उपयुक्त वाटेल. या अॅपवरून तयार केलेली लिस्ट तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींसोबत, कुटुंबासोबत किंवा सहकाऱ्यांसोबत शेअरही करता येतील. शिवाय या यादीसोबत फोटो किंवा डॉक्युमेंटही जोडता येईल. एखादी गोष्ट विसरू नये म्हणून त्यासाठीचं रिमाईंडर तुम्हाला लावता येईल. आपल्या याद्या विषयवार फोल्डर करून ठेवता येतील. फोन, टॅब किंवा कम्प्युटर असं कुठूनही तुम्हाला हे अॅप वापरता येईल.


Packpoint - फिरायला जाणाऱ्यांसाठीचं हे अॅप. कोणत्या शहरात जाताना सोबत कुठल्या वस्तू घ्यायच्या, हे ठरवायला हे अॅप तुम्हाला मदत करेल, कारण तुम्हाला या अॅपमध्ये त्या त्या जागेनुसार सामानाची यादी करता येईल. शिवाय तिथे गेल्यावर तुम्ही काय काय करणार यानुसारही यादी करता येईल. यामुळे सामान बांधण्याचं काम सोपं होईल. म्हणजे तुम्ही ऑफिसच्या कामासाठी जाणार की फिरायला, आंतरराष्ट्रीय ट्रिप असेल तर काय सोबत घ्यावं लागेल, थंडी असणार का, पोहायचा, बीचवर जायचा किंवा ट्रेकिंगचा बेत आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार हे अॅप तुम्हाला करायला लावेल.


Splitwise - खर्चाचा हिशोब ठेवायला मदत करणारं हे अॅप. विशेष म्हणजे मोठ्या ग्रुपमध्ये बाहेर गेल्यानंतर कोणी कशाचे पैसे दिले, कोणाचे किती पैसे द्यायचे आहेत, याची आकडेमोड करत बसावी लागणार नाही. एकच घर भाड्याने घेऊन राहणाऱ्यांसाठीही हे अॅप उत्तम आहे. या अॅपवर तुमचा ग्रुप तयार करा, खर्चाची नोंद करा, त्यामुळे कोणी किती खर्च केला वा तुम्हाला कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, किंवा कोणाकडून यायचे आहेत,’ हे समजेल. अशाने मोठ्या ग्रुपमध्ये असताना गोंधळ उडणार नाही.


Sleep Cycle : Sleep analysis & smart alarm clock - तुमच्या झोपेचं विश्लेषण करून तुम्हाला सकाळी उठवणारं हे अॅप. हे अॅप तुमच्या झोपण्याच्या पॅटर्नचा अभ्यास करेल आणि तुम्ही हलक्या झोपेत असताना तुम्हाला उठवेल. शिवाय तुमच्या निद्रेचा पॅटर्न कसा आहे, गाढ झोप साधारण कोणत्या वेळी लागते, पुरेसे झोपता का, त्याचा तब्येतीवर काय परिणाम होतोय, या सगळ्याचं विश्लेषण हे अॅप करेल. 


Drink Water - पाणी पिण्याची आठवण करून देणारं हे अॅप! हे अॅप वापरायला लागल्यावर लक्षात येतं, की आपण किती कमी पाणी पीत होतो. हे अॅप तुम्हाला पाणी पिण्याची आठवण करून देईल. तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता, ते पुरेसं आहे का, याचं विश्लेषण करेल आणि तुम्हाला निरोगी ठेवायला मदत करेल.


TED - टेड टॉक्स ऐकायला आवडणाऱ्यांसाठी हे अॅप म्हणजे पर्वणीच. यूट्यूबरही हे टेड टॉक्स उपलब्ध आहेत. या अॅपमध्ये विषयवार टॉक्स तुम्हाला मिळतील. काही पॉडकास्ट आहेत. शिवाय इथल्या टेड टॉक्स व्हिडिओजना हिंदी, तमिळ, उर्दू, बंगाली, मराठी आणि इतर भाषांमध्येही सबटायटल्स उपलब्ध आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link