Next
मॅनेजमेंटचे आकर्षण
शर्मिला लोंढे
Friday, October 19 | 04:00 PM
15 0 0
Share this storyसध्याच्या करिअरच्या क्षितिजावर असे अनेक अभ्यासक्रम आहेत, ज्यांना शाखेची मर्यादा नसते. म्हणजेच हे अभ्यासक्रम सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी खुले असतात. अशा अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणतात. अशाच अभ्यासक्रमांपैकी अतिशय मागणी असलेला, करिअरच्या क्षितीजाचा उच्चांक गाठणारा आणि अतिशय आकर्षक असा एक अभ्यासक्रम म्हणजे मॅनेजमेंट.

खरं तर ‘मॅनेजमेंट’ म्हणजे व्यवस्थापन जे आपल्या दैनंदिन जीवनात क्षणोक्षणी सामावलेलं आढळतं. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये, गृहिणींना घरकामामध्ये, नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घर आणि नोकरी/व्यवसाय यातील त्यांच्या तारेवरच्या कसरतीमध्ये, एखाद्या कुटुंबाला वार्षिक सहलीची आखणी करण्यामध्ये, त्या कंपनीचं कामकाज सांभाळण्यामध्ये आणि अगदी स्त्रियांना भिशीमध्येसुद्धा व्यवस्थापन लागतंच की. आपण सगळेच जण आपल्या दिनचर्येमध्ये प्रत्येक गोष्टीत व्यवस्थापन करत असतो. ज्यांना हे कौशल्य किंवा ही कला अवगत असते किंवा जे ती शिकण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं आयुष्य सर्व दृष्टींनी चांगल्या पद्धतीनं ‘मॅनेज’ होतं, फारसे खाच-खळगे, टक्के टोपणे न खाता.

व्यवस्थापनाचं हे महत्त्व आपल्या खासगी व व्यावसायिक दोन्ही आयुष्यात सारखंच आहे. म्हणूनच याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची संकल्पना आपल्या समाजात रुजू झाली आहे. कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थापन करताना, अनेक गोष्टींचा, अनेक बाजूंचा विचार करावा लागतो व सगळेच हिशेब चपखल बसवावे लागतात. त्यामुळे व्यवस्थापनाचा कोणताही अभ्यासक्रम किंवा क्षेत्र असलं, तरी काही माहिती, अभ्यासकौशल्य आत्मसात करणं क्रमप्राप्त असतं. अशी काही माहिती आणि कौशल्य म्हणजे नियोजन (planning), संयोजन (co-ordination) प्रशासन (administration), अर्थकारण (finance), जनसंपर्क (public relations), विपणन (Marketing). वरील अभ्यासाच्या व्यतिरिक्त प्रत्येक शाखा, क्षेत्र किंवा specialisation प्रमाणे निरनिराळी माहिती अभ्यासक्रमामध्ये आवश्यक ठरते. उदाहरणार्थ, IT Management साठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे. ह्युमन रिसोर्सेससाठी (HR) मानसशास्त्र, संवादकौशल्य, ताणतणावाचं नियोजन अशा गोष्टींची जाण स्वाभाविक आहे. जाहिरातीचं माध्यम (Advertising) व त्यातील नियोजन व कौशल्य, ऑपरेशन्स, मार्केटिंग, डिझाईन व इव्हेन्ट मॅनेजमेंटसारख्या शाखांसाठी सयुक्तिक ठरतं. प्रॉडक्शन मॅनेजमेंटमध्ये निर्मितीप्रक्रिया, आवश्यक सामग्री, कामगारांची उपलब्धी, निर्मितीनियोजन, विकास व विपणन अशा अनेक क्रियांचं संयोजन करावं लागतं. डिझाईन मॅनेजमेंटमध्ये डिझाईन मॅनेजर, क्रिएटिव्ह डायरेक्टर, ब्रँड मॅनेजर यांसारख्या हुद्द्यांवर काम करणारे सर्जनशील असणं महत्त्वाचं असतं. फायनान्स मॅनेजमेंटशी निगडित काम करणाऱ्यांना अकाउंटिंग, फायनान्स, इकॉनॉमिक्स, बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस आणि कॉर्पोरेट लॉ, इन्श्युरन्स व रिस्क मॅनेजमेंट यांसारख्या बँक, स्टॉक मार्केट व फायनान्स मिनिस्ट्रीचा अभ्यास असणं आवश्यक असतं. पर्यावरणाशी निगडित दोन शाखा म्हणजे एनव्हायर्नमेंट मॅनेजमेंट व डिझास्टर मॅनेजमेंट यासाठी प्रदूषण, अॅसिड रेन, डिफॉरेस्टेशन, इकोसिस्टम, पूर, वाइल्डलाइफ, त्सुनामी, भूकंप अशा निसर्गाच्या वैविध्यपूर्ण रूपांची व आपत्तींची माहिती, अभ्यास व धोका पारखण्याचं प्रसंगावधान अपेक्षित असतं. जनसंपर्क व संवादकौशल्य प्रामुख्यानं HR, Marketing, disaster Event, Personal Management यांसारख्या क्षेत्रांसाठी गरजेचं ठरतं.

सध्याच्या काळामध्ये इव्हेंट मॅनेजमेंट अगदी घरगुती सणवार, कार्यक्रमांपासून, शाळा व कॉलेजमधील वार्षिक उत्सव, जत्रा, प्रदर्शन, साहित्यसंमेलन, क्रीडामहोत्सव, परिषद अशा सर्व ठिकाणी आवश्यक झालं आहे. क्रियाशीलता, वेगळेपणा, आव्हानं, आऊटडोर काम याची आवड असणाऱ्या व नेतृत्व, भाषेवर प्रभुत्व, मानसिक सजगता बाळगणाऱ्या बोलक्या, मनमिळावू व्यक्ती या क्षेत्रामध्ये चपखल बसतील.

जनसंपर्क व संवादकौशल्य लागणारं पर्सनल मॅनेजमेंट हे क्षेत्र व्यापक असून, त्यात इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन, ट्रेड युनियन, लेबर स्टडीज, Entrepreneurship, सुपरवायजिंग, टेक्निक्स अशा अनेक विषयांचा समावेश आहे व त्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. आता बऱ्याच पदवी अभ्यासक्रमांशी निगडित व्यवस्थापनाच्या शाखा निर्माण झाल्या आहेत. जसं वैद्यकीय शिक्षणाला अनुरूप हेल्थ केअर मॅनेजमेंट व हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन, फार्मसीमध्ये MBA Pharma, Biotechnology मध्ये MBA Biotech, Mass Media communication मध्ये MBA in Media and Entertainment, Management of Education, Tourism management इत्यादी.

मॅनेजमेंटच्या शाखांची यादी अजून बरीच आहे. रिटेल, इंटरनॅशनल बिझनेस, सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट, लॉजिस्टिक, एक्स्पोर्ट, टेक्सटाईल, कम्युनिकेशन, स्पोर्ट्स मॅनेजमेंट…

वरील वर्णनात्मक विवेचनातून हे उघडच आहे, की मॅनेजमेंटक्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आवश्यक असलले पैलू म्हणजे कुशाग्र बुद्धी, चौफेर ज्ञान, अनेकांगी व्यक्तिमत्त्व व प्रसंगावधान.

‘मॅनेजमेंट’ क्षेत्रातले अभ्यासक्रम वेगवेगळ्या स्तरांवर उपलब्ध आहेत. १२वी नंतर पदवी अभ्यासक्रम (BMS – Bachelor in management studies / BBA – Bachelor in business administration) व डिप्लोमा कोर्सेस दोन्ही आहेत. त्याचप्रमाणे पदव्युत्तर पातळीवरही डिप्लोमा व डिग्री दोन्ही पर्याय आहेत. पदव्युत्तर स्तरावरचे अभ्यासक्रम पार्ट टाइम व फुल टाइम दोन्ही प्रकारचे असतात. मॅनेजमेंटच्या निरनिराळ्या शाखांमधले अभ्यासक्रम राबवणाऱ्या काही संस्था अशा आहेत. – जमनालाल बजाज, मिठीबाई, चेतना, इंडियन मर्चंट चेंबर, टाटा इस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, डी.वाय. पाटील, सिम्बॉयसिस, सिंहगड इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया फॅशन अॅण्ड अलाईड आर्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, आयआयटी, इमर्जन्सी मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, आर्मड् फोर्स मेडिकल कॉलेज, वेलिंगकर इत्यादी.

अधिक माहितीसाठी -
www.dte.org.in,
www.sibm.edu,
www.simsree.org,
www.welinkar.org,
www.niemindia.com,
www.iimmumbai.org,
www.indiaeducation.net

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link