Next
अॅण्ड्रॉइड डेझर्ट्स
अमृता दुर्वे
Friday, August 30 | 04:00 PM
15 0 0
Share this story


टेक्नॉलॉजीच्या जगातली एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे इथल्या अनेक गोष्टींची नावं निसर्गाशी संबंधित आहेत. वेब, ट्वीट, बग, क्लाऊड असे अनेक शब्द टेक्नॉलॉजीजगतानं निसर्गाकडून घेतले. 

तसंच अॅण्ड्रॉइडनं आपल्या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमला दिलेली नावं होती ही डेझर्ट्सची...म्हणजे गोड पदार्थांची. पण आता मात्र अॅण्ड्रॉइडने ही परंपरा थांबवायचं ठरवलंय. 

अॅण्ड्रॉइडच्या या आतापर्यंतच्या ऑपरेटिंगच्या सिस्टीम्सपैकी बहुतेकांची नावं ही गोड पदार्थांची होती. 

अॅण्ड्रॉइडचे डेव्हलपर्स या ऑपरेटिंग सिस्टीमचे कोड वापरायचे आणि मग जगभरातल्या टेकप्रेमींची उत्सुकता ताणत हे नाव जाहीर केलं जायचं. 

अॅण्ड्रॉइडचं सगळ्यात पहिलं व्हर्जन होतं अल्फा. दुसरं व्हर्जन होतं बीटा. 

A आणि B वरची ही नावं झाल्यानंतर अॅण्ड्रॉइडनं गोड पदार्थांना सुरुवात केली आणि C वरून आलं कपकेक व्हर्जन. 

मग दरवर्षी पुढचं अक्षर आणि त्यावरून सुरू होणारं गोड पदार्थांचं नावं, हा सिलसिला ठरूनच गेला. Android (Alpha) Android (Beta)

Android Cupcake Android Donut

Android Eclair Android Froyo

Android Gingerbread Android Honeycomb

Android Ice Cream Sandwich Android Jellybean

Android KitKat Android Lollipop

Android Marshmallow Android Nougat

Android Oreo Android Pie

Android 10

N आणि Oची पाळी आली तेव्हा तर गुगलनं लोकांनाच नाव सुचवण्यास सांगितलं, आणि जगभरातल्या टेकीजना एक वेगळाच खुराक मिळाला. नोगा आणि ओरिओ नावं ही लोकांनी सर्वाधिक सुचवलेली नावं होती. मग चर्चा सुरू झाली P वरून काय नाव असणार याची. 

पॉपसिकल, पेपरमिंट, पेस्ट्री, प्रालिन, पीनट ब्रिटल, पॅनकेक अशा नावांवरून इंटरनेटवर चर्चा झडल्या आणि गुगलनं नाव जाहीर केलं – पाय.

खरी गंमत पुढे होती. Q या अक्षरावरून कोणतं नाव येणार हा प्रश्न टेकप्रेमींनाच नाही तर गुगललाही पडला होता. 

कारण Qवरून सुरुवात होणारे फारसे पदार्थ नाहीत. त्यात गोड पदार्थांची संख्या आणखीच कमी आहे. शिवाय जगभर ओळखले जाणारे आणि Q वरून नाव सुरू होणारे पदार्थ त्याहून कमी. आणि हे बहुतेक पदार्थ अमेरिकेच्या बाहेरचे होते. म्हणूनच कंपनी याबाबत काय करते याविषयी चर्चा सुरू होती. 

त्याचवेळी एक वेगळीच टीका गुगलवरही होत होती. 

गुगलनं आतापर्यंत अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमना दिलेल्या नावांपैकी सगळेच पदार्थ अमेरिकन होते. काही जगभर माहीत होते, काही फक्त अमेरिकेतच प्रसिद्ध होते. परंतु अॅण्ड्रॉइडचे युजर्स मात्र जगभर होते. मग नावं फक्त अमेरिकन का?

शिवाय अनेक नावांच्या उच्चारांबद्दल अनेक भाषांमध्ये गोंधळ होता. जगभरातल्या काही भाषांमध्ये L आणि Rचे उच्चार स्पष्टपणे केले जात नाहीत. 

कारण अॅपलने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीमला ‘बिग कॅट्स’ची नावं दिली होती. चिता, प्युमा, जग्वार, टायगर, लेपर्ड, स्नो लेपर्ड आणि लायन अशी नावं दिल्यानंतर ‘बिग कॅट्स’च्या सर्व प्रजाती संपल्या आणि अॅपलनं ही थीम थांबवली आणि इतर नावं द्यायला सुरुवात केली. 

त्यामुळे Q पासून गुगल अॅण्ड्रॉइडसाठी नावांची नवीन थीम सुरू करेल असा टेकप्रेमींचा अंदाज होता. 

परंतु शेवटी अॅण्ड्रॉइडच्या नावांमधला हा प्रयोग अखेर थांबवण्याचं ठरवण्यात आलं. त्याऐवजी आता यापुढे सगळ्यांना समजेल वा लक्षात राहील अशी नावं–क्रमांक देण्यात येणार आहेत. जगभरामध्ये सुमारे २.५ बिलियन (दशकोटी) डिव्हायसेसवर अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यामुळेच या मार्केटचा विचार करत गुगलनं हे पाऊल उचललंय. गुगलच्या नव्या अॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जनचं नाव असेल – अॅण्ड्रॉइड १०.

यासोबतच गुगलनं अॅण्ड्रॉइडचं ब्रॅण्डिंगही बदललंय. आतापर्यंतच हिरव्या अक्षरांतलं नाव आता यापुढे काळ्या अक्षरांमध्ये असेल. हिरव्या रंगामुळे नाव नीटपणे वाचता येत नव्हतं, म्हणून हा बदल करण्यात आल्याचं गुगलनं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. 

येत्या काही आठवड्यांत हा अपडेटेड लोगो वापरायला सुरुवात होईल. अॅण्ड्रॉइड १० सगळ्या फोन्ससाठी कधी उपलब्ध होणार हेदेखील अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. 

पाहायला गेलं तर तर ही ऑपरेटिंग सिस्टीमच्या नावाबद्दलची लहानशी गोष्ट, पण खाद्यपदार्थांची नावं देण्यात आल्यानं अनेक जण त्याच्याशी जोडले गेले. त्यातली रंजकता वाढली. ऑपरेटिंग सिस्टीमबद्दलची क्लिष्ट भावना कमी व्हायला मदत झाली.

परंतु आता अॅण्ड्रॉइडची गेल्या १० वर्षांची ही परंपरा थांबतेय...

सो... गुडबाय अॅण्ड्रॉइड डेझर्ट्स!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link