Next
गाडी-गप्पा
- रेणू दांडेकर
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मित्रांनो, तुम्हाला गाड्या फार आवडतात ना? आजचा खेळ आहे- गाडी-गप्पा. म्हणजे गाड्यांवर बोलूया. आधी गोलात बसून एकेकाने एकेक असे गाड्यांचे प्रकार सांगा. सायकल, स्कूटर, घोडागाडी, मोटारगाड्यांचे प्रकार, ट्रेनचे प्रकार, इत्यादी. आकाशातल्या गाड्या म्हणजे विमाने, त्यांचे प्रकार... पाण्यावरच्या गाड्या म्हणजे होड्या, जहाजांचे प्रकार... मोजा किती प्रकारच्या गाड्यांची यादी जमते.
एकेका गाडीची सविस्तर माहिती एकेकाने सांगायची, असाही खेळ खेळू शकता. उदाहरणार्थ, एक जण मेट्रो ट्रेनबद्दल सांगेल तर दुसरा ट्रामबद्दल, तिसरा बैलगाडीबद्दल तर चौथा विजेवर चालणाऱ्या मोटारीबद्दल... एकाने सांगितलेली गाडी अन्य कुणी परत सांगायची नाही.  
मग दोनचाकी व चारचाकी गाड्यांचा प्रत्येकी एक गट करा. एकेका गटाने मिळून एकेका वाहनाचे नाव आणि वैशिष्ट्य सांगा. ती गाडी कशी आहे तिचे वर्णन, तिचे खास गुण, तिच्या मशीनबद्दलची माहिती, इत्यादी.
मग काही आगळी वाहने- रॉकेट, अवकाशयान यांबद्दल चर्चा करता येईल.
शाळेत मोकळ्या तासाला किंवा मित्र-मैत्रिणी एकत्र जमल्यावर हा खेळ खेळा, बघा किती रंगतो!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link