Next
मसाला क्रिकेटची धूम
नितीन मुजुमदार
Monday, March 25 | 06:00 PM
15 0 0
Share this story


एका कंपनीच्या सीइओपदासाठी मुलाखत सुरू असते. मुलाखत घेणारी व्यक्ती समोर बसलेल्या मध्यमवयीन तरुणाला सांगते, ‘आम्हाला एका शांत व धीर धरू शकणाऱ्या व्यक्तीची गरज आहे.’ मुलाखतीसाठी आलेला तरुण सांगतो, ‘सर, मी गेल्या ११ वर्षांपासून आरसीबीचा फॅन आहे’ आणि त्या तरुणाची सीइओ म्हणून निवडही होते! हे आणि असे अनेक रंजक किस्से तुम्हाला आयपीएलबद्दल ऐकायला मिळतील. गेल्या दशकभरात जागतिक क्रिकेटचा आत्मा असलेल्या भारतात तरुण क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर आयपीएलने अक्षरशः एकहाती कब्जा केला आहे, हे एक निर्विवाद सत्य आहे.
टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी व लोकप्रिय अशी ही वार्षिक क्रिकेटस्पर्धा २३ मार्चपासून सुरू होत आहे. कॉर्पोरेट्सचा मोठा सहभाग असलेल्या या स्पर्धामहोत्सवात यंदा आठ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे बारावे वर्ष आहे. चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स यांनी या आधी ही स्पर्धा प्रत्येकी तीन वेळा जिंकली आहे, तर दिल्ली कॅपिटल्ससारख्या संघाला अजून पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे. यावेळी त्यांनी तयारीत कोणतीही कसर सोडलेली नाही. रिकी पाँटिंग व सौरव गांगुली यांसारखे दिग्गज त्यांचे मेंटर आहेत. यापूर्वी केवळ दोन वेळा त्यांचा संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता, तर एकदा त्यांनी तिसरे स्थान मिळवले होते. उरलेल्या सात प्रयत्नांत दिल्ली कॅपिटल्स संघ किमान पाचव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर राहिलेला दिसतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेदेखील ही स्पर्धा एकदाही जिंकलेली नाही.

मुंबई इंडियन्सने गेल्या सहा वर्षांत तब्बल तीन वेळा विजयाचा करंडक उंचावला आहे. २०१३मध्ये तर त्यांनी चॅम्पियन्स क्लब ट्रॉफीदेखील जिंकली होती. त्याच वर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएलदेखील जिंकली होती. यंदा मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सलामीलाच खेळण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. लसिथ मलिंगादेखील पुनरागमन करतोय. याआधी अजिबात संधी न मिळालेल्या गुणवान, मुंबईसाठी क्रायसिसमॅन म्हणून ओळखला जाणाऱ्या सिद्धेश लाड याला यंदा संधी मिळण्याची चिन्हे आहेत. रोहित शर्माने तसे बोलूनदेखील दाखवले आहे. सिद्धेशला या आधीच संधी मिळायला हवी होती. गेले तीन हंगाम तो मुंबई इंडियन्ससाठी बेंचवर आहे. गेली अनेक वर्षे तो मुंबई रणजी संघासाठी अतिशय सातत्याने खेळतोय. एकाच नव्हे तर सर्व फॉरमॅट्समध्ये तो खोऱ्याने धावा काढतो आहे. या वर्षी ५० षटकांच्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने मुंबईसाठी मोक्याच्या क्षणी विजयी खेळी साकारली होती. युवराजसिंगची मुंबई संघात निवड होणे मात्र अनाकलनीय आहे.
 
मुंबई इंडियन्सचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, युवराजसिंग, किरोन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, ईशान किशन, लसिथ मलिंगा, कृणाल पंड्या, सूर्यकुमार यादव, एविन लुईस, बेन कटिंग, मिशेल मॅकक्लिनघन, मायकेल मारकांडे, आदित्य तरे, जेसन बेहॅन्डरॉफ,सिद्धेश लाड, अॅडम मिल्ने, राहुल चहर, क्विंटन डिकॉक, रसिक सालाम, अंकुल रॉय, जयंत यादव, बरींदर, पंकज जैस्वाल व अनमोलप्रीत सिंग.
 कागदावर मुंबईचा संघ इतरांच्या तुलनेत खूप मजबूत वाटतो. आयपीएलमधील पहिली पाच वर्षे तशी मुंबई इंडियन्सला फारशी चांगली गेली नव्हती. याला अपवाद २०१० व २०११चा होता जेव्हा ते अनुक्रमे दुसरे व तिसरे होते. गेल्या ६ वर्षांत त्यांची कामगिरी खूप उंचावली आहे. २०१३पासून दर एकवर्षाआड विजेतेपद मिळवत आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज हा या स्पर्धेतील सर्वात जास्त यशस्वी आणि ग्लॅमरस संघ! आपल्या एकूण नऊ आयपीएल वर्षांमध्ये तीन वेळा विजेतेपद व चार वेळा उपविजेतेपद या संघाने मिळवले आहे. उरलेल्या दोन वर्षी म्हणजेच २००९ साली या संघाने सेमीफायनल गाठली होती, तर २०१४मध्ये हा संघ तिसरा होता. कर्णधार माहीचा फार मोठा वाटा चेन्नई सुपर किंग्जच्या ब्रँड इमेजमध्ये आहे.
 
चेन्नई सुपर किंग्जचा संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), के. एम. असिफ, सॅम बिलिंग्ज, चैतन्य बिस्नोई, द्वेन ब्रावो, दीपक चहर, फाफ डूप्लेसिस, ऋतुराज गायकवाड, हरभजनसिंग, इम्रान ताहीर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, एन. जगदेशन, मोनुकुमार, लुंगी निगडी, सुरेश रैना, अंबाती रायडू, मिशेल सँटनर, कर्न शर्मा, मोहित शर्मा, ध्रुव शेवरे, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, शेन वॉटसन, डेव्हिड विली.
 चेन्नई सुपर किंग्जच्या संघनिवडीच्या पॅटर्नमध्ये एक विशेष बाब आढळली ती म्हणजे धोनीच्या संघाने अनुभवावर दिलेला भर. चेन्नई सुपर किंग्जच्या संघात धोनी (३७ वर्षे), ब्रावो (३५), फाफ दुप्लेसिस (३४), हरभजन (३८), इम्रान ताहीर (३९), केदार जाधव (३३), सुरेश रैना (३२), अंबाती रायडू (३३), कर्न शर्मा (३१), मोहित शर्मा (३०), मुरली विजय (३४) व शेन वॉटसन (३७) हे तब्बल १२ खेळाडू तिशी ओलांडलेले आहेत! शिवाय रवींद्र जडेजादेखील या वर्षी तिशी पार करेल. फिटनेसला खूप महत्त्व असलेल्या या फॉरमॅटमध्ये धोनीच्या संघाचे हे वेगळेपण खरोखर धाडसी आणि कौतुकास्पद म्हणावे लागेल.
मुंबई आणि चेन्नईनंतर कायम चर्चेत असलेला संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. विराट कोहलीच्या या संघाने आतापर्यंत तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे आणि एकदाही विजेतेपद मिळवलेले नाही. कोहली नशीबवान आहे, या गौतम गंभीरने केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत कोहलीसमोर यंदा मोठे आव्हान आहे हे निश्चित.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ
विराट कोहली (कर्णधार), एबी.डी. विलीअर्स, हेटमेयर, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, उमेश यादव, मोईन अली, पार्थिव पटेल, मार्कस स्टोईनीस, नवदीप सैनी, नाथन कोलटर नील, टीम साउदी, मोहम्मद सिराज, कुलवंत खेजरोलिया, हेन्रीच क्लासेन, प्रयास राय बर्मन (१६ वर्षीय लेग स्पिनर), वॉशिंग्टन सुन्दर, कोलीन डी ग्रँडहोम, पवन नेगी, देवदत्त पड्डीकल, गुरक्रितसिंग, मिलिंद कुमार, हिम्मत सिंग, आकाशदीप नाथ.
राजस्थान रॉयल्सच्या संघाने यापूर्वी एकदा आयपीएलचे अजिंक्यपद  मिळवले आहे.
 
राजस्थान रॉयल्सचा संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी, स्टिव्ह स्मिथ, मनन व्होरा, जोस बटलर, संजू सॅमसन, ए. शटन टर्नर, आर्यमान बिर्ला, शुभम रांजणे, रियान पराग, शशांक सिंग, बेन स्टोक्स, महिपाल लोमरोर, जोफ्रा आर्चर, के. गौथम, स्टुअर्ट बिन्नी, लियाम लिविंगस्टोन, श्रेयस गोपाल, मिधून एस., ईश सोधी, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी, वरुण एरॉन, ओशेन थॉमस.
 कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी हा कालखंड काही सिद्ध करण्याचा आहे, मात्र तो फार अवघड आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून यंदा ख्रिस गेलसारखा मोहरा खेळणार आहे.
किंग्ज इलेव्हनची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे २०१४ मधील, उपविजेतेपदाची.
 
किंग्ज इलेव्हनचा संघ
आर. अश्विन (कर्णधार), के. एल. राहुल, ख्रिस गेल, डेव्हिड मिलर, करुण नायर, मयांक अगरवाल, मुजीब उर रहमान, आंद्रु टाइ, मनदीपसिंग, सरफराज खान, सॅम कुरान, मॉइसेस हेन्रीक्स, वरुण चक्रवर्ती, दर्शन नालकांडे, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, प्रभसीमरन सिंग, निकोलस पुरान, अंकित राजपूत, अरश्दीपसिंग, मोहंमद शमी, एम. अश्विन, हर्दस व्हीजोईन.
 दिल्ली डेअर डेव्हिल्सने यंदा नाव बदलून आयपीएलमध्ये उतरायचे ठरवले आहे. गेल्या सहा स्पर्धांत या संघाने सहापेक्षा वरचा क्रमांक मिळवलेला नाही. हा संघ आता दिल्ली कॅपिटल्स नावाने स्पर्धेत खेळेल.
 
दिल्ली कॅपिटल्सचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, संदीप लमीछने, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट, कॉलिन मुनरो, ख्रिस मॉरिस, कोलीन इनग्राम, मंजोत कालरा, शेरफन, किमो पॉल, हर्षल पटेल, हनुमा विहारी, अक्सर पटेल, जलराज सक्सेना, राहुल तेवातीया, अंकुश बेंस, अवेश खान, कगीसो रबाडा, इशांत शर्मा, नथु सिंग, बंदारू अय्यपा.
 सनरायजर्स  हैदराबादने या स्पर्धेत यापूर्वी एकदा विजेतेपद पटकावले होते, ते २०१६मध्ये. ‘आमच्या संघात कोणीही सुपरस्टार नाही त्यामुळे संघातील वातावरण अधिक चांगले असते, असे मला वाटते’ असे सनरायजर्स  संघाचा मेंटर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण म्हणतो. जॉनी बॅरस्टो, विजयशंकर, अभिषेक शर्मा व शाहबाझ नदीम हे संघातील नवे खेळाडू. या संघातील इतर खेळाडू आहेत- केन विल्यम्सन, डेविड वॉर्नर, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, युसूफ पठाण, शकीब अल हसन, मनीष पांडे, सिद्धार्थ कौल, मार्टीन गपटील, रिकी, दीपक हुडा, मोहम्मद नबी, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, खलील अहमद, बसिल थंपी, बिली स्ट्नलेक, टी. नटराजन, संदीप शर्मा.
 कोलकाता नाईट रायडर्सने यापूर्वी दोन वेळा आयपीएलस्पर्धेवर जेतेपदाची मोहोर उमटवली आहे.
 
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ
दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उत्थप्पा, निखिल नाईक, ख्रिस लॅन, नितीश राणा, शुभमन गिल, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील एन., जो डेंनले, अंरींच नोरजे, श्रीकांत मुंढे, करलॉस ब्रेथवेट, पीयूष चावला, कुलदीप यादव, पी. कृष्ण, लोकी फर्ग्युसन, पृथ्वीराज यारा, हॅरी गुर्ने, के. सी. करिअप्पा, संदीप वॉरीअर.
 कोलकात्याच्या संघातही सुपरस्टार्स अभावानेच दिसतात. मसाला क्रिकेट भारतीय क्रिकेटचे क्षितिज काबीज करायला सिद्ध झाली आहे. पाहुया या वर्षीचे ‘इन्स्टंट क्रिकेट’ किती प्रमाणात स्मृतिपटलावर कोरले जाते ते!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link