Next
संतूर
- मोहन कान्हेरे
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

बालमित्रांनो, पं. शिवकुमार शर्मा यांचे नाव एक फार कसलेले विख्यात संतूरवादक म्हणून तुम्हाला परिचित असेल. त्यांचे भावमधुर वादन तुम्ही रेडिओ, टीव्हीवर नक्की ऐकले असेल. कदाचित रंगमंचावरील त्यांचे सादरीकरण समोर बसून तुम्ही ऐकले असेल. हे वाद्य ऐकताना सर्वात आधी त्याचा गोडवा मनाला भिडतो, बरोबर! पं. वसंतराव देशपांडे म्हणत, “अहो, या वाद्याच्या तारांवरून उंदीर जरी धावत गेला तरी निर्माण होणाऱ्या ध्वनीचं वेड लागेल.”
असे हे वाद्य साथसंगत करत आणि सोलो वादनासाठीसुद्धा उपयोगी पडते. चित्रपटगीते, गझल, क्वचित कधी भक्तिगीतेसुद्धा संतूरच्या साथीमुळे अत्यंत श्रवणसुखद झालेली असतात.
अगदी पुरातन संस्कृत ग्रंथांतून या वाद्याचा उल्लेख ‘शततंत्री वीणा’ असा केला आहे. शततंत्री म्हणजे शंभर तारा असलेले. या वाद्याचा उगम काश्मीरमध्ये झाला. सुरुवातीला लोकसंगीताला साथ करण्यासाठी संतूरचा वापर करत असत. या वाद्याचा आकार ‘चतुर्भुजाकार’ आहे. अक्रोडाच्या झाडाचे लाकूड वापरून एक बॉक्स बनवली जाते. (फोटो पाहा) तिच्यावर धातूच्या सुमारे बाहत्तर तारा चढवलेल्या असतात. त्या हव्या तशा खेचून सुरात लावल्या जातात. अर्धपद्मासन घालून, कलाकार हे वाद्य आपल्या पुढ्यात घेतात. दोन्ही हातात तारांवर नाजूक आघात करण्यासाठी छोट्या लाकडी स्टिक धरलेल्या असतात. पुढच्या बाजूला त्या किंचित वाकवलेल्या असतात. सुरांचे वेगवेगळे अलंकार सुरुवातीला ऐकवले जातात, ज्यांतून विशिष्ट रागाचे आल्हाददायी वातावरण तयार होते. आलापीनंतर तबल्याच्या साथीने रागांची धून वाजवण्याचा प्रघात आहे. गेल्या वर्षी दिवंगत झालेले पं. उल्हास बापट हिंदी चित्रपटांतील गाण्यांसाठी उत्तम साथसंगत करत. एकल वादनातही ते प्रवीण होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link