Next
डॉ. राजेंद्र प्रसाद
विजय काळे (संस्कार भारती)
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story

१९०२ मधली गोष्ट आहे. त्या वर्षी कलकत्ता विश्वविद्यालयाच्या प्रवेशपरीक्षेत बिहारचा राजेंद्र प्रसाद पहिला आला होता. कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला. बिहारच्या बाहेर तो पहिल्यांदाच आला होता. कॉलेजच्या पहिल्या दिवशी तो बाकीच्या विद्यार्थ्यांना बघतच राहिला! सगळे पाश्चिमात्य वेशभूषेत होते, पण नावे सगळ्यांची भारतीय होती. हजेरी झाली तेव्हा राजेंद्रचे नाव घेतले गेले नाही. खूप धैर्य एकवटून तो उभा राहिला आणि त्याने हे प्राध्यापकांच्या निदर्शनास आणून दिले. प्राध्यापक त्याच्याकडे बघतच राहिले, राजेंद्रने नेहमीप्रमाणे कुडता-पायजमा आणि टोपी असा वेष केला होता. प्राध्यापक राजेंद्रला कॉलेज विद्यार्थी मानायला तयारच नव्हते. राजेंद्रने आपले नाव सांगितल्यावर सगळे विद्यार्थी व प्राध्यापक चकित झाले, हे नाव तर सर्वांच्याच चर्चेत होते. प्राध्यापकांनी आपली चूक लगेच दुरुस्त केली.
वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा राजेंद्रवर असाच प्रसंग ओढवला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत त्याचे नाव नव्हते. राजेंद्रने हे प्रिंसिपॉलच्या लक्षात आणून दिले. प्रिंसिपॉलनी राजेंद्रला उलट उत्तरे करण्याबद्दल दंड ठोठावला. परंतु राजेंद्र वर्गात पहिला आला आहे हे लक्षात आले आणि दंडाचा प्रश्नच उद्भवला नाही. या दोन्ही प्रसंगांतून विनम्र असलेल्या राजेंद्र प्रसादने एक धडा घेतला, संकोच न ठेवता आवश्यक तेव्हा आत्मविश्वास दाखवला पाहिजे.
मित्रांनो, हा विद्यार्थी म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद. दोन कार्यकाळ पूर्ण करणारे ते एकमेव राष्ट्रपती आहेत. १९६२ मध्ये राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link