Next
सांगा सांगा, लवकर सांगा
- रेणू दांडेकर
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story

खेळायला आपल्याला खूप आवडतं. खेळाच्या तासाला आपण किती आनंदात असतो! तो तास कसा संपतो कळतही नाही. तो तास नसला तर कंटाळा येतो. घरी आलं की केव्हा एकदा दप्तर टाकून खेळायला पसार होतोय असं होतं. आईनं हाक मारली तरी घरात जावंसं वाटत नाही. म्हणून तर हे वेगळे खेळ.
चला, आपण आपल्या जोड्या लावूया. त्यासाठी आधी मोठा गोल करू. प्रत्येकाने एक-दोन असे मोजू. दोन म्हणणाऱ्यांचा एक गट होईल आणि एक म्हणाणाऱ्यांचा दुसरा गट होईल. एकजण उरलाच तर तो लीडर होईल. किंवा आपल्यातील एक लीडर नेमावा लागेल. तो पळा पळा असं म्हणेल. दोन्ही गोल एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं पळतील. पळणं जोरात सुरू झालं की लीडर ‘पळा पळा’ असं म्हणणं थांबवेल. जी मुलं समोरासमोर येतील त्यांच्या जोड्या होतील. प्रत्येक जोडी एका खेळाविषयी गप्पा मारेल. त्यासाठी आधी खेळांची नावं जाहीर करावी लागतील. यात बैठे खेळ, मैदानी खेळ, वैयक्तिक खेळ, सांघिक खेळ, मोबाइलवरील खेळ असे प्रकार पाडता येतात. प्रकारानुसार खेळ घेऊन एकेक जोडी त्या त्या खेळाविषयी गप्पा मारेल. मैदानी खेळात हॉकी, फूटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, कबड्डी, लंगडी, खोखो, लगोरी, टेबलटेनिस, लपाछपी असे सांघिक खेळ घेता येतील. यात कदाचित तुम्हाला मोठ्यांचीही मदत घ्यावी लागेल. यातही साधनं लागणारे खेळ किंवा साधनं न लागणारे खेळ असाही फरक करता येईल.
 एरवी हे खेळ आपण मैदानावर खेळत असतो. परंतु त्याविषयीची माहिती, नियम, खेळाडू याबद्दल एकमेकांमध्ये बोलण्याने खेळासंबंधीची माहिती परिपूर्ण होते. शिवाय तुम्हाला त्याबद्दल बोलायचीही सवय लागते. दरवेळी मैदानी खेळ शक्य नसतात, परंतु थोड्या शारीरिक सक्रियतेने खेळातच मन रमवण्याचा खेळही खेळता येतो. बघा तर खेळून!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link