Next
बालिश उत्तर
- अमृता जोशी
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

विराटपर्वातील कथा आहे. पांडव विराटराजाकडे अज्ञातवासात राहत होते. विराटराजा दक्षिणेकडील राजाशी युद्धात गुंतला होता. त्याच्याबरोबर त्याचे सगळे सैन्य आणि चारही पांडवपण होते. विराटनगरीत नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला युवराज उत्तर होता. कौरवांनी गायी पळविल्याची बातमी त्याला कळली तेव्हा तो अंतःपुरातील स्त्रियांसमोर बढाया मारत होता- “मी सहजच जाऊन गायींना सोडवून आणू शकेन. कौरवांचे सैन्य मारणे मला काही अवघड नाही. मी खूप पराक्रमी आहे, पण माझ्या रथाला सारथी नाहीये. तो मागच्या युद्धात मारला गेला.” त्याची ही बालिश बडबड बृहन्नडेचे रूप धारण केलेल्या अर्जुनापर्यंत जाऊन पोचली. बृहन्नडा उत्तरच्या रथाचे सारथ्य करायला तयार झाली. बृहन्नडेने म्हणजेच अर्जुनाने उत्तरचा रथ कौरवांच्या सैन्यासमोर आणून उभा केला. कर्ण-दुर्योधनादि सगळ्यांना पाहून उत्तर एवढा घाबरला की यांच्याबरोबर युद्ध करणे शक्य नाही, मला लगेच विराटनगरीत घेऊन चल, अशी गयावया तो त्याच्या सारथ्याकडे करू लागला.
बृहन्नडेने उत्तरला धीर देऊन युध्दासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला, पण राणीवशात बढाया मारणारा उत्तर युद्धभूमीवर घाबरून गेला. कवी मोरोपंतांनी त्याचे छान शब्दांत वर्णन केले आहे- ‘बालिश बहु बायकात बडबडला.’ आपण खूप पराक्रमी आहोत अशी प्रौढी मारणारा उत्तर युद्धभूमीवर मात्र घाबरून गेला. अर्जुनाने अनेक प्रकारे त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. आपण जर गायी परत न घेता गेलो तर लोक आपल्याला हसतील, तुझा उपहास करतील, पळून जाणे हा क्षत्रियांचा धर्म नाही... भिऊन पळत असलेल्या उत्तरच्या मागे बृहन्नडा झालेला अर्जुनही पळत होता. स्त्रीवेषात असला तरी तो अर्जुन असावा अशी शंका कौरवांना आली.
अर्जुनाने शमी वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे काढली आणि स्वतःच कौरवांशी युद्ध केले आणि गायी परत आणल्या. अज्ञातवास संपला असल्यामुळे तो मूळ रूपात प्रकट झाला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link