Next
रात
प्रदीप निफाडकर
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story


एकच विषय शायर कशा नजरेतून बघतात हे या दोन शेरांवरून कळेल. ज़की काकोरवीसारखा वैतागलेला माणूस प्रेयसीला विचारेल-
तू ही बता दे कैसे काटूँ
रात और ऐसी काली रात
ही रात्र, त्यातही एवढी काळी रात्र तूच सांग कशी काढू? परंतु जिगर मुरादाबादी यांच्यासारखा शायर विरहातही किती छान बोलतो-
आज न जाने राज़ ये क्या है
हिज्र की रात और इतनी रौशन
कळत नाही, ही विरहातली रात्र आहे तरीही इतकी चमकदार, प्रकाशमान कशी आहे? तुझ्या आठवणींमुळे की तुझी चाहूल लागल्यामुळे?
चराग़ हसन हसरत भलेही म्हणत असतील-
रात की बात का मज़कूर ही क्या
छोड़िए रात गई बात गई
सोडा, जाऊ द्या. रात्र गेली. संपले सगळे. आता चर्चा कशाला करायची? तरीही रात्रीची चर्चा वेगवेगळे शायर करणारच. कारण कुणाला ती सहवासाची असते तर कुणाला ती विरहाची. एखादाच अहमद मुश्ताक़ असतो. तो म्हणतो-
ये तन्हा रात ये गहरी फ़ज़ाएँ
उसे ढूँढे कि उस को भूल जाएँ
ही एकटी रात्र, या गंभीर वातारवणात तिला शोधावे की तिला विसरून जावे, असा प्रश्न त्यांना पडतो. बाकीच्यांची मात्र सय्यद मोहम्मद असर यांच्याप्रमाणे हालत होते-
दिन कटा जिस तरह कटा लेकीन
रात कटती नज़र नहीं आती
दिवस तर कसाबसा ढकलला, पण ही रात्र? ती मात्र जाते की नाही असे वाटत आहे. कै. ज़ेब ग़ौरीसाहेबांना तर ही रात्र घेऊनच गेली-
कुछ दूर तक तो चमकी थी मेरे लहू की धार
फिर रात अपने साथ बहा ले गई मुझे
माझ्या रक्ताची धार लांबवर चमकत होती. मी ते पाहिले आहे. नंतर मात्र मला ही रात्र आपल्यासोबत वाहत वाहत घेऊन गेली. रात्र आली म्हणजे चंद्र, चांदण्या आल्या. त्यावर अहमद मुश्ताक़ काय म्हणाले, बघा-
चाँद भी निकला सितारे भी बराबर निकले
मुझसे अच्छे तो शब-ए-ग़म के मुक़द्दर निकले
चंद्र आला. चांदण्या आल्या. सगळे अगदी बरोबर आले. म्हणजेच माझ्या विरहरात्रीचे नशीब माझ्यापेक्षा चांगले निघाले म्हणायचे. माझ्या जीवनात अंधार आणि अंधार आहे. जणू काही जीवन म्हणजे रात्रच आहे. तर अनवर मसूद हे रात्रीची प्रतीक्षा करीत म्हणाले-
रात आयी है बलाओं से रिहाई देगी
अब न दीवार न ज़ंजीर दिखाई देगी
रात्र येईल. साऱ्या संकटांपासून मुक्ती देईल. मग ना भिंत, ना पायातले साखळदंड दिसतील. या रात्रीची प्रतीक्षा केलीच पाहिजे. पण, ती रात्र भुरर्कन उडून जायला नको. कारण जावेद कमाल रामपुरी यांच्याकडून ऐका-
दिन के सीने में धड़कते हुए लम्हों की क़सम
शब की रफ़्तार-ए-सुबुक-गाम से जी डरता है
रात्रीच्या वेगवान प्रवासाने जीव घाबरतो हो. खरेच. हवेतर दिवसाच्या धडधडणाऱ्या क्षणांची शपथ. दिवसाचे धडधडणारे हृदय त्यांना दिसते. तर दिवसाला घाबरणारेही आहेत. त्यांना उलट रात्रच आवडते. त्यांचे नाव जावेद नासिर. ते म्हणाले-
रात आ जाए तो फिर तुझको पुकारूँ या-रब
मेरी आवाज़ उजाले में बिखर जाती है
हे ईश्वरा, रात्र आली की तुला आवाज देईन. कारण दिवसाच्या प्रकाशात माझा आवाज विखरून जातो. काय रात्र आणि काय दिवस? सारेच काही नश्वर आहेत. अताउर्रहमान जमील यांच्या मते-
आने वाली आ नहीं चुकती जानेवाली जा भी चुकी
वैसे तो हर जानेवाली रात थी आनेवाली रात
येणारी रात्र येतेच. जाणारी जातेच. तशी तर येणारी प्रत्येक रात्र ही जाणारच आहे. येणारी प्रत्येक रात्र जाणारीच तर होती. कशाला घाबरायचे आणि कशाला उदास व्हायचे? त्या रात्रींचा आस्वाद घ्यायचा. मग ती विरहाची असो की मिलनाची. ती अनुभवायचीच. शायर तसेही फकीरच असतात. त्यांना तर याची भीती वाटायलाच नको. आबिद वदूद यांनी चांगले सांगितले आहे-
हम फ़क़ीरों का पैरहन है धूप
और ये रात अपनी चादर है
हे दिवसाचे ऊन म्हणजे आम्हा फकिरांचे कपड़े आहेत. ही रात्र? ही रात्र तर आमची चादर आहे. तिला मस्त पांघरून झोपावे. काही शायरांनी तर या रात्रीला आईची जागा दिली आहे. तनवीर सिप्रा हे वारले परंतु त्या आधी त्यांनी ही उपमा दिली-
ऐ रात मुझे माँ की तरह गोद में ले ले
दिनभर की मशक़्क़त से बदन टूट रहा है
हे रजनी, मला आईसारखे कुशीत घे. दिवसभराच्या मेहनतीने माझे शरीर थकून जाते ग, अशी विनवणी त्यांनी केली होती. साबिर दत्त यांनी तर स्वप्नातल्या प्रेयसीला कुशीतून न जाण्याची विनवणी केली होती-
ख़्वाबों से न जाओ कि अभी रात बहुत है
पहलू में तुम आओ कि अभी रात बहुत है
स्वप्नातून तू जाऊ नकोस, अजून रात्र भरपूर आहे. माझ्या कुशीतून तू निसटू नकोस, अजून रात्र खूप आहे. थांब. बेदिल हैदरी यांची तर कमाल पाहा, धाडस पाहा-
रात को रोज़ डूब जाता है
चाँद को तैरना सिखाना है
रोज रात्री चंद्र बुडून जातो. रात्रीच्या अंधाऱ्या काळ्या तलावात. त्याला एकदा पोहणे शिकवले पाहिजे. म्हणजे तो बुडणार नाही. काय धाडस आहे नाही? चंद्राला पोहायला शिकवायचे? वा! शहरयार यांच्या घरी रात्र कशी अवतरली ते पाहा-
पहले नहाई ओस में फिर आँसुओं में रात
यूँ बूँद बूँद उतरी हमारे घरों में रात
प्रथम दवबिंदूमध्ये न्हाऊन घेतले, मग माझ्या अश्रूंमध्ये. आमच्या घरात रात्र अवतरली ती अशी थेंब थेंब टपकत. एकदम आली नाही. हळूहळू रेशीमधार बरसावी तशी. मख़दूम मुहिउद्दीन यांना रात्री कोण भेटायला आले ते तर पाहा-
हिज्र में मिलने शब-ए-माह के ग़म आए हैं
चारासाज़ों को भी बुलवाओ कि कुछ रात कटे
विरहाच्या रात्रीत भेटायला चंद्राच्या रात्रीच्या वेदना आल्या आहेत. चला, वैद्यांना बोलवा म्हणजे रात्र छान निघून जाईल. वैद्य म्हणजे तुमचे डॉक्टर नाही हं. माझा डॉक्टर. म्हणजे माझी प्रेयसी. तिला बोलवा. आमचे मित्र फ़रहत एहसास मात्र एका विशिष्ट टप्प्यावर थांबले आहेत. कोणता आहे तो टप्पा? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच तो.
इक रात वो गया था जहाँ बात रोक के
अब तक रुका हुआ हूँ वहीं रात रोक के
ज्या रात्री ती माझे बोलणे थांबवून गेली होती, मी अजूनही तिथेच आहे, ती रात्र थांबवून ठेवली आहे. कधी येईल ती, असे म्हणत. ही रात्र थांबवून जगण्याची धमक खऱ्या प्रेमिकात असते. तुम्हीही थांबला असाल तर नक्की कधीतरी वो सुबह आयेगी. वसीम बरेलवी यांनी हे आवाहन स्वीकारले आहे. ते म्हणतात-
रात तो वक़्त की पाबंद है ढल जाएगी
देखना ये है चराग़ों का सफ़र कितना है
रात्र तर काळाची कैदी आहे. काळबद्ध आहे. ती तिची वेळ झाली की जाणारच. बघायचे हेच की हे प्रेम करणारे दिवे किती काळ तग धरतात. ते पुन्हा रात्र येईपर्यंत जळले, जगले तर खरे प्रेम.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link