Next
यूट्यूबच्या विश्वात रमताना...
अमृता दुर्वे
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

Whatsupmoms - हे आहे एक अमेरिकन युट्यूब चॅनल. आणि याची खासियत अशी की दोन मॉम्सनी मिळून हे चॅनल सुरू केलंय. थोडक्यात सांगायचं झालं तर हे आहे एक पेरेंटिंग चॅनल. पण यामध्ये तुम्हाला डॉक्टरी सल्ले मिळणार नाहीत. तर इथे आहे साध्या सोप्या पेरेंटिग टिप्स, हेल्दी आणि सोप्या रेसिपीज आणि तुम्हाला मुलांसोबत करता येतील अशा अॅक्टिव्हिटीज. या सगळ्या गोष्टी एका आईच्या दृष्टिकोनातून सांगितल्या गेल्या असल्याने यामध्ये अनेक लहान लहान तपशील तुम्हाला सापडतील. यातल्या रेसिपी अमेरिकन असल्या तरी त्यातल्या खूपशा आपल्यालाही करणं शक्य आहे.

Do it On a Dime - स्वस्तात मस्त गोष्टी आपल्याला सगळ्यांनाच हव्या असतात. हे चॅनल चालवणारी कॅथरिन असंच अनेक गोष्टी आपल्याला स्वस्तात कशा करता येतील ते सांगते. यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या DIY (Do it Yourself) गोष्टी आपण आरामात घरी करू शकतो. आणि मुळात म्हणजे या गोष्टी करणं सोपं आणि स्वस्त आहे. शिवाय कॅथरिन आपल्या घरातल्या वेगवेगळ्या खोल्या किंवा कपाटं ऑर्गनाईज कशी करायची हे देखील सांगत असते. साध्या सोप्या भाषेमध्ये, ३ ते ५ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये देण्यात येणारी माहिती अतिशय रंजक असते.

The Family Fudge
- हे आहे युट्यूबवरचं एक फॅमिली चॅनल. हे चालवणारी जेनिफर एक अतिशय भन्नाट गोष्ट करते. ती म्हणजे Bunches of Lunches या सीरिजद्वारे ती मुलांच्या डब्यासाठीच्या विविध गोष्टी दाखवत असते.  आणि यामध्ये अगदी वेगवेगळ्या थीम्सनुसारही डबे ती बनवते. तिच्या चार मुलांच्या वयांनुसार ती या गोष्टी करत असते. पुन्हा एकदा, या सगळ्या गोष्टी अमेरिकन आहेत. अनेक पदार्थ अमेरिकन असतात, पण ती विविध देशांतले पदार्थही करत असते. आणि केवळ लहानांच्याच नाही, तर मोठ्यांच्या डब्यासाठीही नव्या कल्पना मिळतील.

Garden Up - नेहमीपेक्षा अगदी वेगळं असं हे चॅनल. हे चालवणारी एकता ही Phd करणारी विद्यार्थिनी आहे. तिच्या झाडांच्या आणि बागकामाच्या आवडीतून तिने हे चॅनल सुरू केलं. या चॅनलवर तुम्हाला घरगुती बागकामासाठीची सगळी माहिती आणि टिप्स मिळतील. फुलझाडं, हर्ब्ज, शोभेची झाडं घरामध्ये कशी लावायची, कुठे ठेवायची, त्यांची निगा कशी ठेवायची, याची माहिती एकता साध्या- सोप्या शब्दांत देते.
Indian Farmer - सांगलीचे संतोष जाधव हे त्यांच्या ‘इंडियन फार्मर’ या युट्यूब चॅनलवर शेतीविषयक माहिती अगदी साध्या-सोप्या हिंदीमध्ये देतात. यामध्ये काही टिप्स आहेत, नवीन पद्धतींची ओळख आहे आणि सगळ्यात भन्नाट गोष्ट म्हणजे शेतीविषयक वाहनं, मशीन्स यांचे रिव्ह्यूजही आहेत. संतोष त्यांना विचारल्या जाणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरंही स्पेशल व्हिडिओज मधून देत असतात.

The Dad Lab - घरच्या घरी मुलांसोबत तुम्हाला काही वैज्ञानिक प्रयोग करून पहायचे असतील तर हे चॅनल नक्की पहा. लहान मुलांना विज्ञानाची गोडी लावायची असेल किंवा साध्या-सोप्या गोष्टींमधलं विज्ञान समजावून द्यायचं असेल किंवा अगदी सुटीच्या दिवशी घरात मुलांना रमवायचं कसं, हा प्रश्न सोडवायचा असेल तर हे चॅनल बेस्ट आहे. सर्गेई या पूर्ण वेळ बाबाने त्याच्या अलेक्स आणि मॅक्स या दोन मुलांसोबत केलेले हे विज्ञान प्रयोग. शैक्षणिक खेळणी, वैज्ञानिक खेळणी आणि साधेसोपे प्रयोग या युट्यूब चॅनलवर असतात.

Ask Iosis - Hindi - इंटिरियर डेकोरेशन हा तसा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आपल्या घरासाठीच्या टिप्स देणारे हे चॅनल आर्किटेक्ट निहारा हिचे आहे. लहान घराची आखणी कशी करायची, घरामध्ये काम करून घेताना कोणतं मटेरियल कुठे वापरायचं, लायटिंग आणि फ्लोअरिंगच्या टिप्स ते अगदी सोफ्यासाठी कापड कसं निवडायचं, इथपर्यंतची माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलवर आपल्या भारतीय घरांसाठीची उपयुक्त माहिती तुम्हाला मिळेल. याशिवाय तुम्हाला स्वतः करता येतील अशा गोष्टी दाखवणारे व्हिडिओजही या चॅनलवर असतात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link