Next
अमित शाह, जयशंकर मंत्रिमंडळात
विशेष प्रतिनिधी
Friday, May 31 | 05:00 PM
15 0 0
Share this story


नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत बहुमताने विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाची निवडणूकव्यूहरचना ठरवणारे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. पाच राज्यांमधील निवडणुका पाहता अमित शाह यांच्याकडे मंत्रिपद येणार की पक्षाची धुराच राहणार, याबाबत औत्सुक्य होते. शाह यांच्याप्रमाणेच परराष्ट्रव्यवहारखात्याचे सचिव राहिलेले सुब्रमण्यम जयशंकर यांचा मंत्रिमंडळातील समावेशही आश्चर्यकारक ठरला. 
 नवी दिल्लीत राष्ट्रपतीभवनाच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी मोदी सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी दिमाखात पार पडला. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मोदी व राजनाथ सिंह यांच्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतली. अपेक्षेप्रमाणेच राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, पीयूष गोयल व संजय धोत्रे या भाजपच्या सदस्यांबरोबरच शिवसेनेचे अरविंद सावंत यांनीही शपथ घेतली. शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे वृत्त ‘झी मराठी दिशा’ने दिले होते.   महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कोण? 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link