Next
डमरू
- मोहन कान्हेरे
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

हे तर पौराणिक महत्त्व असलेलं वाद्य! भगवान शंकर डमरू वाजवत हे आपणास माहीत आहे. आकारानं अगदी लहान असलं तरी या वाद्याचा आवाज मोठा असतो. किमान एक किलोमीटच्या परिसरात तो ऐकला जाऊ शकतो. याचं कारण असं की त्याच्यावर आघात करायला दोन टणक गुंड्या ज्या जाड दोरीनं डमरूलाच जोडलेल्या असतात. दोन्ही बाजूंना जाड चामडं (बहुतेक वेळा बकरीचं) जोडलेल असतं. मधला भाग किंचित आतल्या बाजूला आवळलेला असतो. तो तसा असतो म्हणून वादकाला धरायला सोपं जातं. काही शिवमंदिरांतून मोठ्या नगाऱ्याच्या शेजारी डमरू ठेवलेला असे. आरतीच्या वेळी गुरव मंडळी नगारा वाजवत व त्याच्या जोडीला डमरूचा नादही करत. संपूर्ण गावाला, मंदिरात आरती सुरू झाल्याचं समजत असे.
लहानमोठ्या आकाराचे, विविध रंगांचे डमरू पाहायला मिळतात. हरियाणा येथील शिवंदिरात चामड्याऐवजी प्लास्टिक वापरून बनवलेले डमरू पाहायला मिळाले. (प्राणीहिंसा टाळावी म्हणून) त्यांचा ध्वनी वेगळाच होता. तिबेटमध्ये बौद्धमंडळी डमरूचा उपयोग करतात. विशेषत्वानं तंत्रविद्येसाठी हे वाद्य उपयोगात आणतात.
शिवतांडवनृत्य सादर करताना अन्य वाद्यांच्या बरोबरीनं हे वाद्यही वापरलं जातं. (विशेषत: लोकनृत्यात) मौर्यकाळात कोसांबी समाजात नृत्याविष्कार करताना डमरूची साथ घेत असत.
नेपाळमध्ये मानवी खोपडीचा वापर करून (एक नराची, दुसरी नारीची) डमरू बनवले जात.  त्याला खोपडी डमरू म्हणत. आता अर्थातच त्यावर बंदी आहे. तंत्रविद्या हा प्रकार नेपाळमध्ये आजही प्रचारात आहे.
आवश्यकतेनुसार या वाद्याचा स्वर कमीअधिक ठेवला जातो. ध्वनीची पातळीसुद्धा लहानमोठी (आकारानुसार) असते. या वाद्याची किंमत १००० रुपयांच्या आसपास असते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link