Next
जगातील रंगीत नाणी
संजय जोशीे
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

तंत्रज्ञानाने मानवी जीवनाच्या जडणघडणीत भरीव योगदान दिले आहे. आर्थिक व्यवहार हा तर मानवी जीवनाच्या आशा-आकांक्षांचा पाया आणि चलन हे तर या व्यवहारांचे मुख्य साधन. या चलनातही तंत्रज्ञानाने वेळोवेळी क्रांती घडवली. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात नाणी बनवण्याच्या प्रक्रियेत आधुनिकता आली होती. संपूर्ण जगसुद्धा सगळ्याच बाबतीत रंगीत होऊ लागले होते. मग त्याला नाणी तरी अपवाद कशी ठरतील ?
प्रारंभ
जगात पहिल्यांदा रंगीत नाणी दोन आफ्रिकन देशांनी पाडली.  ही नाणी १९९३ साली पूर्व आफ्रिकेत युगांडा आणि इक्वेटोरियल गिनी यांच्यासाठी बनवण्यात आली होती.

रंगीत नाणी बनवायची, तर काही अटींची पूर्तता करावी लागते. :
* ज्या राष्ट्राला ही नाणी पाडायची आहेत, त्याची ओळख सार्वभौम राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून असली पाहिजे.
* फक्त रंगीत नाणी पाडण्यास परवानगी होती व त्यांना अधिकृत चलन म्हणून मान्यता मिळायला हवी.
* नाणी पाडतानाच त्याचा रंग संबंधित देशाच्या टाकसाळीत किंवा सरकारने चलनासाठी मान्यता दिलेल्या संस्थेकडून निश्चित केला जायला हवा..  

युगांडा : 
किकाया हिलमध्ये वसलेला देश. संपूर्ण आफ्रिकेमध्ये फक्त युगांडा देशातच बहाई मंदीर आहे.
राजधानी : कम्पाला, ठिकाण : आफ्रिका खंड , चलनात आणलेले वर्ष : १९९३, परिमाण : १००० शिलिंग, १००० युगांडियन शिलिंग म्हणजे भारतीय १९ रुपये, नाण्यावरील दर्शनी बाजूस : राष्ट्रीय शस्त्रे, नाण्यामागील बाजूस : रंगीबेरंगी डोगरांची रांग, सध्याचे बाजारमूल्य -  ३० डॉलर

इक्वेटोरियल गिनी :
हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनार्‍यावरील एक छोटा देश आहे. हा असा एकमेव आफ्रिकन देश आहे जिथे स्पॅनिश ही अधिकृत भाषा आहे.
राजधानी : मलाबो, ठिकाण : पश्चिम आफ्रिका, चलनात आणलेले वर्ष : १९९३, परिमाण : ७०००  फ्रॅंक , ७००० फ्रॅंक म्हणजे भारतीय ५४ रुपये, नाण्यावरील दर्शनी बाजूस : झाडाचे चित्र, नाण्यामागील बाजूस : ज्युरॅसिक डायनोसोअर, सध्याचे बाजारमूल्य  : ३३ डॉलर, हे नाणे आत्ताच्या मॉडर्न जगात पूर्वीच्या विलुप्त प्राण्यांबद्दल माहिती देण्यासाठी खासकरून चलनात आणले होते.

पापुआ न्यू गिनी :
हा ओशनिया खंडातील एक देश आहे. येथे ८०० पेक्षा जास्त भाषा वापरात आहेत.
राजधानी : पोर्ट मॉरेस्बी, ठिकाण : प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला, चलनात आणलेले वर्ष : २०१८, परिमाण : ५० टोआ, ५० टोआ म्हणजे भारतीय ११ रुपये.
नाण्यावरील दर्शनी बाजूस : ५ रंग असलेले रंगीत वर्तुळ
नाण्यामागील बाजूस : पंख पसरलेला पक्षी
सध्याचे बाजारमूल्य : ५ डॉलर

कॅनडा :
रशियानंतर कॅनडा हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा देश आहे. कॅनडामध्ये छोटे मोठे धरुन जवळ जवळ ३० लाख तलाव आहेत.
राजधानी : ओटावा
ठिकाण : उत्तर अमेरिका
चलनात आणलेले वर्ष : २०१८
परिमाण : २ कॅनेडियन डॉलर
२ कॅनेडियन डॉलर म्हणजे भारतीय १०० रुपये.
नाण्यावरील दर्शनी बाजूस : राणी  एलिझाबेथ दुसरी
नाण्यामागील बाजूस : विशाल असे हेल्मेट आणि खसखस बिया, सध्याचे बाजारमूल्य : ५ डॉलर
हे नाणे खासकरून १९१८ ते २०१८ या शंभराव्या वर्धापनदिनानिमित्त युद्धविरामाच्या स्मरणार्थ काढले होते.

पनामा : हा मध्य अमेरिकेतील देश आहे. ‘बाल्बोआ’ हे याच्या चलनाचे नाव एक स्पॅनिश प्रवासी वास्को नुनेझ दि बाल्बोआ याच्यावरून पडले.
राजधानी : पनामा शहर
ठिकाण : कॅरेबिअन समुद्र
चलनात आणलेले वर्ष : २०१९
परिमाण : १ बाल्बोआ
१ पनामेनियन बाल्बोआ म्हणजे भारतीय ७० रुपये.
नाण्यावरील दर्शनी बाजूस : रिपब्लिका पनामा
नाण्यामागील बाजूस : Jornada Mundial de la Juventud
आत्ताची बाजार किंमत : ५ डॉलर
हे नाणे जागतिक तारुण्य दिवसानिमित्त चलनात आणले होते.

ऑस्ट्रेलिया : 
हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड आणि देश आहे. असे म्हणतात की तुम्ही जर ऑस्ट्रेलियात जाऊन रोज एक नवीन बीच बघायचे ठरवलेत, तर सर्व किनाऱ्यांचे दर्शन घ्यायला २७ वर्ष लागतील.
राजधानी : कॅनबेरा
ठिकाण : पॅसिफिक समुद्राच्या नैऋत्य दिशेला
चलनात आणलेले वर्ष : २०१९
परिमाण : २ ऑस्ट्रेलियन डॉलर
२ ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे भारतीय १०० रुपये
नाण्यावरील दर्शनी बाजूस : मस्कॉट बरोबी
नाण्यामागील बाजूस : २०१८ कॉमनवेल्थ गेम्स
आत्ताची बाजार किंमत : १ डॉलर
हे नाणे म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या २१ व्या कॉमनवेल्थ गेम्सचा ताइत आहे. नाण्याच्या आतील गोल तीन वेगवेगळ्या रंगांनी म्हणजे पिवळ्याने सूर्य , निळ्याने आकाश , हिरव्याने वन्यजीव असे सु्ंदर  निसर्गचित्र दर्शवते.
आपला भारतही पहिले रंगीत नाणे एप्रिल २०२० मध्ये चलनात आणणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.  
शब्दांकन : गौरी भिडे

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link