Next
कोण मुसंडी मारणार?
प्रतिनिधी
Friday, November 16 | 04:00 PM
15 0 0
Share this storyअवघ्या  महाराष्ट्राचे आणि तमाम कुस्तीप्रेमींचे डोळे लागलेल्या ‘झी महाराष्ट्र  कुस्ती दंगल’चा अंतिम थरार रविवारी, १८ नोव्हेंबर रोजी होत असून कोणता संघ  आणि कोणता कुस्तीपटू बाजी मारणार याची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. २  नोव्हेंबरपासून श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजेच पुण्यातील  बालेवाडी स्टेडियममध्ये कुस्तीची दंगल सुरू असून याचे थेट प्रक्षेपण झी  टॉकीजवर संध्याकाळी ६ वाजल्यापासून दाखवले जात आहे.

महाराष्ट्रातील  कुस्तीची परंपरेला पाठबळ नेण्यासाठी आणि कुस्तीगीरांना हक्काचे व्यासपीठ  मिळवून देण्यासाठी झी समूहाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात अशा  पद्धतीच्या इव्हेंटचे आयोजन करणारी ‘झी टॉकीज’ ही पहिली वाहिनी आहे. या  कुस्ती दंगलीत कोल्हापुरी मावळे (संघमालक - सई ताम्हणकर), पुणेरी उस्ताद  (शांताराम मानवे), विदर्भाचे वाघ (स्वप्निल जोशी), वीर मराठवाडा (नागनाथ  मंजुळे), यशवंत सातारा (पुरुषोत्तम जाधव) आणि मुंबई अस्त्र (प्रणव डाके)  असे सहा तगडे संघ असून त्यांच्या संघात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय  स्तरावरील महिला व पुरुष कुस्तीपटू आहेत. महाराष्ट्र केसरीचा किताब तीन वेळा जिंकणारा विजय चौधरी जशी डरकाळी फोडत एन्ट्री घेतो तशीच वाघासारखी खेळीही करतो.
‘पुणेरी उस्ताद’मधील या स्टार खेळाडूने सलग नऊ विजय मिळवत त्याचा दरारा कायम ठेवला आहे.  भारतीय सैन्यातील फौजी विनोद कुमारने ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’मधील सगळे डाव जिंकलेच, शिवाय प्रेक्षकांची मनेही जिंकली.  ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी आणि त्यांच्याकडून कुस्तीपटूंना मिळणारे प्रोत्साहन यामुळे
श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील वातावरण अगदी भारून गेले होते.  हरियाणाची अंशू मलिक ही ‘रणरागिणी यशवंत सातारा’ संघातील अमूल्य रत्न आहे. अनेकदा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ने गौरवण्यात आलेल्या अंशूला या कुस्तीदंगलीत एकदा पराजयाला सामोरे जावे लागले. त्यानंतर याच मैदानात तिने पराभवाचे उट्टे  काढले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link