Next
मँगो-ओट्स पॅराडाइज
विशेष प्रतिनिधी
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story


साहित्य - २ हापूस आंब्यांचा रस, २ चमचे ओट्स, साखर, १ चमचा सब्जा, नारळाचं घट्ट दूध, काजू किंवा पिस्त्याचे काप, मँगो इसेन्स

कृती
 ओट्स १० मिनिटे पाण्यात भिजवा. आंब्याचा रस, भिजवलेले ओट्स, २ थेंब मँगो इसेन्स आणि आवश्यकतेनुसार साखर घेऊन मिक्सरमधून एकजीव करून घ्या.
 नारळाच्या दुधात पिठीसाखर घालून मिक्स करा.
 सब्जा पाण्यात भिजवा. काचेच्या ग्लासमध्ये तळाशी भिजवलेला सब्जा घाला. त्यावर हलकेच साखर घातलेले नारळाचे दूध ओता. नंतर त्यावर आंब्याच्या गराचे छोटे तुकडे घालून, त्यावर मिक्सरमधून काढलेले आंबा-ओट्सचे मिश्रण घाला. आंब्याचे तुकडे आणि काजू/पिस्त्यांनी सजवा. हे पेय फ्रीजमध्ये ठेवून थंडगार झाल्यावर सर्व्ह करा.
- स्वरूपी वक्नल्ली
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link