Next
राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१९
फारुक नाईकवाडे
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this storyराज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मुलाखती सध्या सुरू आहेत. या आठवड्यामध्ये ४२५ उमेदवार मुलाखतीस सामोरे जात आहेत. यापैकी बहुतांश उमेदवार एक तर ‘पोस्ट होल्डर’ किंवा एक/दोन मुख्य परीक्षांचा अनुभव असणारे किंवा दोन/तीन वर्षांपूर्वीपासून प्रयत्न करणारे किंवा युपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार अशाच स्वरूपाचे असतील. राज्यसेवा, दुय्यम सेवा, गट-क सेवा या परीक्षांद्वारे यशस्वी झालेल्या उमेदवारांची यादी पाहिल्यास नेमकी हीच बाब अधोरेखित झालेली लक्षात येईल. पहिल्या वा दुसऱ्या प्रयत्नात किंवा ज्यांना फ्रेशर्स म्हणता येईल असे उमेदवारसुद्धा यशस्वी झाले आहेत, पण हे प्रमाण कमी आहे. सन २०१२ नंतर प्रकर्षाने अधोरेखित झालेला हा महत्त्वपूर्ण बदल आहे. या बदलामागे काही कारणे आहेत. १) पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रारूपात झालेला बदल. २) युपीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम आणि प्रश्नांचा अॅप्रोच ३) युपीएससीच्या परीक्षार्थींनी एमपीएससीच्या परीक्षा देण्याचे वाढलेले प्रमाण. या बदलांचे एका वाक्यात वर्णन करायचे तर स्पर्धेची तीव्रता आणि डिफिकल्टी लेव्हल वाढली आहे. म्हणून परीक्षेच्या अभ्यासाइतकेच स्पर्धा परीक्षेच्या अॅप्रोचचा अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे.

येत्या १७ फेब्रुवारी रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे. स्पर्धेत राहायचे असेल तर उमेदवारांना तयारीचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. पारंपरिक अभ्यासाचे ठोकळे, गाईड रट्टा मारून यश मिळवता येणार नाही. विषयाच्या बेसिक वाचनापासून नियोजनबद्ध नेमकी तयारी करावी लागेल. तयारीचे प्राधान्यक्रम काय आणि कसे असावेत या व िषयी पाहू.

अभ्यासक्रम - पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन पेपर एक आणि पेपर दोनसाठी एकूण पंधरा ओळींचा अभ्यासक्रम व या पंधरा ओळींवर चारशे गुणांसाठी १८० प्रश्न विचारले जातात. काठिण्य पातळी जपण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बहुविधानी करण्यात आले आहेत. बहुविधानी स्वरूपामुळे एका प्रश्नातून एका मुद्याच्या वेगवेगळ्या बाजू विचारल्या जातात. म्हणून सर्वप्रथम अभ्यासक्रमाचाच व्यवस्थित अभ्यास करून तुमचा अभ्यासाचा एरिया ठरवा. त्यातील प्रत्येक शब्दाबाबत तुमच्या खिशात कमीत कमी पाच/सहा सुस्पष्ट मुद्दे असायला पाहिजेत. त्यावर कसाही प्रश्न आला तरी त्याला सामोरे जाण्याची तुमची तयारी हवी. निष्कर्ष काढायला सांगणारे प्रश्न आले तर उपलब्ध माहितीच्या आधारे उत्तरे देता आली पाहिजेत. यासाठी बेसिक्स नीट घेणे आवश्यक आहे.

मागील वर्षांतील प्रश्नपत्रिका - आयोगाला काय अपेक्षित आहे व आपल्या अभ्यासाची नेमकी कोणती दिशा असणे आवश्यक आहे हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा आणि अधिकृत मार्ग म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. कोणत्याही प्रकरणाची तयारी सुरू करण्यापूर्वी, आपल्याला त्या प्रकरणाशी निगडित पूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची माहिती असायलाच हवी. त्यातून आपल्या तयारीत नेमकेपणा आणता येतो. कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, काठिण्यपातळी किती आहे, संकल्पनात्मक दृष्ट्या कोणते पैलू महत्त्वाचे, वस्तुनिष्ठ दृष्ट्या कोणते पैलू महत्त्वाचे ते समजून येते.

एक प्रकरणाची तयारी पूर्ण झाली की पुन्हा आधीच्या वर्षातील प्रश्नपत्रिकांवर नजर फिरवा. त्यातील प्रश्नांची उत्तरे समाधानकारकपणे देता येतात का ते तपासून पाहा. अशी स्वयंचाचणी ही आत्मविश्वासाची पातळी उंचावण्यासाठी उपयुक्त ठरते.

संदर्भसाहित्य - राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी वस्तुनिष्ठ माहितीची घोकंपट्टी आणि ठरावीक लोकप्रिय ठोकळे-गाईड वाचून स्पर्धेत टिकणे अवघड आहे. बेसिक पुस्तकांचे वाचन अत्यावश्यक आहे. संदर्भपुस्तक निवडण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा. आपण निवडत असलेले पुस्तक अभ्यासक्रमानुरूप आहे का, हे तपासा. बेसिक पुस्तकांसह इंडिया इयर बुक, योजना, लोकराज्य यांना पर्याय नाही. अभ्यासाच्या सुरुवातीला कोणत्या पुस्तकाची कोणती पाने, प्रकरणे वाचावीत, विशिष्ट प्रकरणासाठी सर्वोत्तम साहित्य कोणते याचे नियोजन तुमच्याकडे तयार नसणे, एकंदर तयारीची ही सर्वांत मोठी उणीव आहेच, पण बहुतेकांच्या अपयशाचे मोठे कारणही बनलेले दिसते. योग्य संदर्भसाहित्याची निवड ही लग्नाचा जोडीदार निवडण्याइतके महत्त्वाचे असते हे लक्षात घ्या.

वाचन-अध्ययन-सराव - संदर्भसाहित्यातून नेमके मुद्दे वेचणे-वाचणे-वाचलेले समजणे-समजलेले स्मरणात साठवणे व योग्यवेळी ते आठवणे अशा अभ्यासप्रक्रियेतील वाचन-आकलन, अध्ययन व सराव हे टप्पे आहेत. वस्तुनिष्ठ तथ्ये विचारणाÈऱ्या प्रश्नांची संख्या कमी असून संकल्पनात्मक, विश्लेषणात्मक प्रश्नांची संख्या जास्त आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपात अचुकतेला जास्त महत्त्व असते. विषयघटक वाचताना अधोरेखन व वारंवार उजळणीचे तंत्र वापरावे लागते. तथ्यात्मक प्रश्नांसाठी हे ठीक आहे पण संकल्पनात्मक, बहुविधानी प्रश्नांसाठी मूलभूत अभ्यास महत्त्वाचा असतो. यासाठी एका विषयावर वेगवेगळे माहितीचे स्रोत हाताळावे लागतील.

एमपीएससीच्या मागील पाच वर्षांतील प्रश्नांचे स्वरूप आणि पॅटर्न पाहता प्रश्न सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे. एमपीएससी विचारते अशा प्रश्नांच्या फॉरमॅटची सवय झाली की प्रत्यक्ष परीक्षा देताना आत्मविश्वास वाटतो आणि वाढतो. अशा प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करण्यासाठी राष्ट्रचेतना प्रकाशनाचे ‘राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

आत्मपरीक्षण - अभ्यास करायची क्षमता उमेदवारांनुरूप वेगवेगळी असते. परंतु आपला अभ्यास किती हे कळण्यासाठीचा मार्ग असतो, परीक्षेपूर्वीची परीक्षा म्हणजे स्वत:ची परीक्षा. वाचन पूर्ण झाल्यावर, अभ्यासक्रमाच्या एक अथवा दोन प्रकरणांवर तुम्ही स्वत:च स्वत:ची छोटी चाचणी घेऊन पाहावी. तुमचे प्लस पॉर्इंट आणि विक पॉर्इंट तुम्हाला शोधून काढता आले पाहिजेत. प्रश्नपत्रिका सोडविण्याची स्वत:ची अशी पद्धत तुम्ही विकसित केली पाहिजे. तुम्ही तुमच्या वेळेचे व्यवस्थापन कसे करता, उपलब्ध वेळेत नेमक्या किती प्रश्नांची उत्तरे देणे तुम्हांला शक्य होते, त्या दोन तासांत तुमचे लक्ष विचलीत झाल्याने किती वेळ वाया जातो, या साÈऱ्या प्रश्नांची तुमच्याकडे ठोस उत्तरे असायला हवीत. त्या उत्तरानुरूप आणि काठिण्यपातळीनुरूप प्रश्नपत्रिका सोडविण्याचे किमान दोन डावपेच तुमच्याकडे असायला हवेत. योग्य समयी तुमची कामगिरी उंचावली पाहिजे आणि ती योग्य वेळ म्हणजे परीक्षेचा दिवस असायला हवा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link