Next
कुजबूज
प्रतिनिधी
Friday, September 07 | 03:00 PM
15 0 0
Share this story

पुन्हा येणार इरसाल गजाली
‘मॅड झालास काय’,’व्हतला व्हतला, सगळा व्हतला’ आणि ‘मी कधी कुणाक काय सांगतंय काय’ हे संवाद पुन्हा लवकरच रसिकांच्या कानावर पडणार आहेत. कोकणच्या निसर्गसौंदर्यात चित्रित झालेली आणि कोकणच्या मातीचा सुगंध असलेली ‘गाव गाता गजाली’ ही मालिका लवकरच झी मराठीवर कमबॅक करणार आहे. या नव्या पर्वाची विशेषता म्हणजे कोकणातील काही नवीन कलाकार असतील, तसेच काही स्थानिक लेखकही लेखन कारणार आहेत. ही मालिका १३ सप्टेंबरपासून रात्री १० वा. आपल्या लाडक्या ‘झी मराठी’वरून प्रसारित होणार आहे. ‘गाव गाता गजाली’ मालिकेतील सर्व पात्रे आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाली होती. कोकणच्या निसर्गसौंदर्यात चित्रित झालेल्या या मालिकेने अगदी थोड्याच काळात लोकांची मने जिंकली.

चार मंडळी जमवून गप्पा छाटत बसणे हा कोकणी माणसांचा आवडता उद्योग. या गप्पांमध्ये गावातील भानगडी ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सगळे विषय असतात. मालवणातील गजालीची धम्माल या मालिकेतून पाहायला मिळते. संतोष कणेकर यांनी ‘गाव गाता गजाली’ची निर्मिती केली असून राजू सावंत यांनी दिग्दर्शन केले आहे. या गजाली लिहिण्याची आणि अभिनयातून पोहोचवण्याची दुहेरी जबाबदारी या मालिकेतही प्रल्हाद कुडतरकर पेलणार आहेत. संपूर्ण टीम ‘गाव गाता गजाली’ मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सिद्ध झाली आहे.


‘बापमाणूस’मध्ये सोहळा लग्नाचा!

 
रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीवर सध्या लग्नाची धावपळ सुरू आहे. ‘बापमाणूस’ या मालिकेत नुकताच सूर्या आणि गीताचा लग्नसोहळा पार पडला आहे. मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांनी आता सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आहेत.

शालूचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यानंतर शब्बीर आणि गीताला सन्मानाने वाड्यात आणले गेले. गीताने त्यासाठी सूर्याचे आभार मानले. गीता वाड्यात नसताना घर किती सुने वाटायचे आणि तिची खूप आठवण येत असल्याची कबुलीसुद्धा सूर्याने गीताला दिली. आईसाहेबांनी सगळ्यांसमोर सूर्या आणि गीताच्या लग्नाची घोषणा केली होती. सध्या दादासाहेब घरात नसल्यामुळे आईसाहेबांनी पुढाकार घेत सूर्या आणि गीताचे लग्न लावले. या दोघांचे लग्न अगदी ग्रँड नसले, तरीही अतिशय चांगल्या प्रकारे हा सोहळा पार पडला.

घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link