Next
महाराष्ट्रात कुस्तीचा महासंग्राम
विशेष प्रतिनिधी
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

यंदाची दिवाळी तमाम मराठीजनांना भरपूर आनंदाची जाणार यात शंका नाही. कारण याच दिवसांत ‘झी टॉकीज’च्या विद्यमाने पुण्याच्या बालेवाडीमध्ये ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ होणार आहे आणि याचे थेट प्रक्षेपण ‘झी टॉकीज’वर रोज संध्याकाळी ६ वाजता केले जाणार आहे. त्यामुळे २ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत अवघे मराठीजन आणि कुस्तीप्रेमी घरबसल्या मराठी मातीतल्या या खेळाचा आनंद घेऊ शकणार आहेत. झटपट क्रिकेटसाठी इंडियन क्रिकेट लीगचा (आयसीएल) पाया घालणाऱ्या ‘झी समूहा’ने आता महाराष्ट्रातल्या मातीचा खेळ समजल्या जाणाऱ्या कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’चे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे ही कुस्तीची दंगलवर मॅटवर होणार असून त्यात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचा सहभाग आहे. मॅटवरील कुस्तीमुळे आपल्या कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मोठा अनुभव मिळणार आहे. आयपीएल, प्रो-कबड्डीप्रमाणेच ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’मध्ये सहा संघ एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे राहणार आहेत. यात अभिनेता स्वप्निल जोशी याच्याकडे ‘विदर्भाचे वाघ’ या संघाची मालकी आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर ‘कोल्हापुरी मावळे’ संघाची मालकीण आहे, तर दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘वीर मराठवाडा’ संघाचे सर्वेसर्वा आहेत. या शिवाय पुरुषोत्तम जाधव (संघ - यशवंत सातारा), प्रणव डाके (संघ - मुंबई अस्त्र) आणि शांताराम मानवे हे पुणेरी उस्ताद संघाचे मालक आहेत. प्रत्येक संघात बारा खेळाडू असून त्यातील सहा खेळणार आहेत. यात महिला कुस्तीपटूंचाही समावेश आहे. कुस्तीचे रूप बदलणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्यावहिल्या कुस्ती महासंग्रामची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मराठी मातीतल्या या अनोख्या कुस्तीस्पर्धेसाठी एक मोठे व्यासपीठ ‘झी टॉकीज’ने उपलब्ध करून दिले आहे.

कुस्ती लोकाभिमुख करणार

माझे वडील तालीम चालवायचे. तेव्हापासून या मर्दानी खेळाबद्दल मला आकर्षण होते. या स्पर्धेत हवे ते खेळाडू घेता आल्याचा मला आनंद आहे. ही संधी दिल्याबद्दल मी झी समूहाचा आभारी आहे. हा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न प्रयत्न आहे.
- शांताराम मानवे, पुणेरी उस्ताद


कु्स्तीचे ज्ञान कामी आले

मी मूळची सांगलीची. त्यामुळे कोल्हापूरच्या कुस्तीच्या परंपरेशी मी अवगत आहे. पैलवानांची जीवनशैली, कोणत्या डावाला काय म्हणतात किंवा कोणता डाव कधी टाकावा याचे मला चांगले ज्ञान आहे. हे ज्ञान कधी ना कधी अशा पद्धतीने उपयोगाला येईल, असे कधीच वाटले नव्हते. परिस्थिती नसल्याने चांगले व्यासपीठ मिळू शकले नाही, असे कोणत्याही कुस्तीपटू किंवा खेळाडूने भविष्यात बोलू नये, हाच माझा ही टीम खरेदी करण्यामागे उद्देश आहे.
- सई ताम्हणकर, कोल्हापुरी मावळे


साताऱ्याची उज्ज्वल परंपरा

आमच्या सातारा जिल्ह्याला कुस्तीची परंपरा आहे. स्वातंत्र्योत्तर भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे या भूमीचेच. म्हणूनच कुस्तीप्रेमींच्या या जिल्ह्याचे या स्पर्धेत प्रतिनिधित्व असावे, असा माझा आग्रह होता. माझा संघ विजयी संघ होईल याची मला खात्री आहे.
- पुरुषोत्तम जाधव, यशवंत सातारास्वप्नपूर्तीचा आनंद

‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ हे ‘झी टॉकीज’ आणि आम्ही सर्वांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. कुस्ती हा अस्सल लालमातीतील भारतीय खेळ आहे. मॅटवरील कुस्ती आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. मात्र या खेळाला अपेक्षित पैसा-प्रसिद्धी मिळाली नाही. हे वास्तव लक्षात घेऊन ‘झी समूह’ आणि ‘झी टॉकीज’ या खेळाला मान, पैसा-प्रसिद्धी देण्यासाठी पुढे सरसावली आहे.
- बवेश जानवलेकर, बिझनेस हेड, झी टॉकीज आणि झी युवा


कुस्तीचा विजय

हा आपल्या सगळ्यांसाठीच एक वेगळा अनुभव असणार आहे. ‘झी टॉकीज’च्या माध्यमातून कुस्तीला जागतिक मंच उपलब्ध होणार आहे. यात संघमालक म्हणून माझा खारीचा वाटा असेल. या स्पर्धेत अत्यंत अटीतटीची सामने रंगणार आहेत. अर्थात यात कुणी जिंको अथवा हरो, विजय हा कुस्तीचा असणार आहे.
- स्वप्निल जोशी, विदर्भाचे वाघ

सकारात्मक पाऊल

मला या उपक्रमाशी जोडला गेल्याचा खूप आनंद आहे. हे व्यासपीठ नक्कीच आपल्या मातीतल्या खेळाला आणखी पुढे आणण्यासाठीचे सकारात्मक पाऊल ठरेल. सर्व संघांना माझ्या खूप खूप सदिच्छा!
- नागराज मंजुळे, वीर मराठवाडा


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link