Next
तीन दिग्गज एकत्र
विशेष प्रतिनिधी
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन, हनहुन्नरी कलाकार राजकुमार राव आणि ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह हे तिघेजण एकाच चित्रपटात दिसणार आहेत. ही किमया साधली आहे ती दिग्दर्शक कबीर कौशिक यांनी. नवीन वर्षात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचा विषय काय असेल आणि इतर कोणते कलाकार यामध्ये झळकतील हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. कबीर कौशिकने याआधी ‘सेहर’, ‘चमकू’, ‘हम तुम और घोस्ट’ आणि ‘मॅक्झिमम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या अमिताभ बच्चन ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. तर राजकुमारच्या हातात ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘मेंटल है क्या’ आणि ‘मेड इन चायना’ हे तीन चित्रपट आहेत. या तीन कलाकारांच्या तारखांची जुळवाजुळव होणं हीसुद्धा दिग्दर्शकासाठी तारेवरची कसरतच असते. तेव्हा कबीर कौशिक या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link