Next
प्रो कबड्डीचा झंझावात
प्रतिनिधी
Friday, November 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story


कबड्डी या खेळाला लोकप्रियेतबरोबरच जबरदस्त ग्लॅमरलही मिळालं आहे. लाल मातीत रंगणारा हा खेळ आता थेट मॅटवर खेळला जातोय. महाराष्ट्रात हूतूतू, केरळात वंडीवडी, चेन्नईत चेडूयुडू, आणि सौची पक्की, बंगालमध्ये हूडूडू तसंच उत्तर भारतात कोनवरा आणि साबरगण्णा या नावानं ओळखला जाणारा हा खेळ आता प्रादेशिकता बाजूला सारत संपूर्ण भारतात कबड्डी म्हणून ओळखला जातो.
बुवा साळवी यांनी कबड्डी खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कबड्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली. कबड्डीचा विश्वचषक आणि एशियन गेम्ससारख्या स्पर्धांमध्ये तर भारताचाच दबदबा आहे. आता प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीला वेगळंच वलय प्राप्त झालं आहे. लीगमुळे तरुणाईमध्ये हा खेळ लोकप्रिय होण्यास मोठी मदत झाली आहे. अनुपकुमार, रिशांक देवाडिगा आणि काशिलिंग आडके यांसारख्या खेळाडूंनी आपल्या अफलातून खेळानं कबड्डी घराघरात पोचवली. २०१४ मध्ये प्रो कबड्डी लीगचा पहिला हंगाम खेळवण्यात आला. पहिल्याच हंगामाला कबड्डीप्रेमींनी लीगला भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास सारेच सामने हाऊसफुल झाले होते. क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जी गर्दी होते तेवढीच गर्दी या कबड्डीपटूंना पाहण्यासाठी होऊ लागली आहे. प्रो कबड्डी लीगनं कबड्डीला अनेक होतकरू खेळाडू दिले. त्याचप्रमाणे पैसा आणि ग्लॅमर आल्यामुळे कबड्डीपटूंची स्वप्नंही या निमित्तानं पूर्ण होत आहेत.
आज भारतीय संघाची निवड करताना अनेक पर्याय संघव्यवस्थापनासमोर उपलब्ध आहेत. ही बाब भारतीय कबड्डीसाठी निश्चितच चांगली आहे. आता तर या प्रो कबड्डी संघांची संख्या आठवरून बारा झाली आहे. यावरूनच कबड्डीची अफाट लोकप्रियता लक्षात येते. पहिल्या हंगामात जे कबड्डीपटू लखपती झाले, ते सहाव्या हंगात करोडपती झाले. यावरून कबड्डीला किती आणि कशी लोकप्रियता मिळत आहे, हे दिसतं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link