Next
हसा हसवा
पुरुषोत्तम अत्रे
Friday, August 09 | 03:45 PM
15 0 0
Share this story

page26प्रेमाची परीक्षा


page26-1
एका मोठ्या मॉलमध्ये घडलेली ही गोष्ट. एका रेस्तराँमध्ये बसलेल्या एका तरुणीकडे एक तरुण आला आणि म्हणाला,
“माझं तुझ्यावर प्रेम आहे.”
तरुणी म्हणाली,
“शेजारी पिझ्झा सेंटर आहे, तिथे जा. तिथे माझी बहीण माझ्यासारख्याच कपड्यांमध्ये बसलेली असेल. तिला जाऊन विचार. ती खूप सुंदर आहे.”
तरुण शेजारच्या पिझ्झा सेंटरमध्ये गेला. तिथे तिच्यासारख्याच कपड्यांमध्ये दुसरी तरुणी होती. यानं तिला पटकन ओळखलं. परंतु ती अत्यंत कुरूप होती. रागारागानं तो परत आला आणि तिला म्हणाला,
“तू माझ्याशी खोटं का बोललीस?”
तरुणी म्हणाली,
“काय खोटं बोलले? ती नाही का तिथे?”
त्यावर तरुण म्हणाला,
“आहे, पण ती अत्यंत कुरूप आहे.”
तरुणी म्हणाली,
“तू तरी कुठे माझ्याशी खरं बोललास? तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं, तर तू तिच्यासाठी धावला नसतास.”माश्या

page26-2
अवंतिकाबाईंना शैलजाबद्दल सतत हेवा वाटत असे. एकदा काही कामानिमित्तानं अवंतिकाबाई शैलजाच्या घरी गेल्या. शैलजा यांचं घर अतिशय सुंदर, नीटनेटकं होतं. नाव ठेवायला जागा नव्हती. तरी एखाददुसरी माशी पाहून त्या शैलजाला म्हणाल्या,
“तुमच्या घरी या माश्यांचा त्रास दिसतो. आल्यापासून बघतेय, या दोन माश्या फिरून फिरून माझ्या माझ्या अंगावर येऊन बसताहेत. घाण वाटते मला.”
त्यावर अवंतिकाबाई म्हणाल्या,
“खरंच, हा एवढा त्रास आहे बघा. घाण वस्तू दिसली की या माश्या कोठून येतात कळत नाही...”

दिलगिरी
थोर नाटककार विडंबनकार आणि संसदपटू शेरडीन यांचा हा पार्लमेंटमधील एक अफलातून किस्सा.
एकदा पार्लमेंटमध्ये बोलत असताना शेरडीन म्हणाले,
“या सभागृहातले निम्मे लोक गाढव आहेत.”
शेरडीन यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात गदारोळ माजला. सगळे सदस्य विरोध करू लागले. मग शेरडीन यांनी आपले शब्द मागे घेण्याची भूमिका घेतली आणि ते म्हणाले,
“मी सभागृहातले निम्मे लोक गाढव आहेत असं म्हटलं होतं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द मागे घेतो. सभागृहातले निम्मे सभासद गाढव नाहीत.”

मॅटर्निटी लिव्ह
कविवर्य नारायण सुर्वे नोकरी करत असतानाची ही गोष्ट. त्यांनी एकदा रजेच्या अर्जावर मॅटर्निटी लीव्ह कॉलमवर टिक केली होती. त्यांचा अर्ज पाहून प्रथम पाहणाऱ्याला आणि नंतर त्यानं सांगितल्यानं ऑफिसमधील इतरांना हसू आवरता येईना. त्यांनी मग नारायण सुर्वे यांना विचारलं,
“हे काय मॅटर्निटी? तुम्ही मॅटर्निटी लीव्ह कॉलमवर टिक केली आहे.”
त्यावर कवी नारायण सुर्वे म्हणाले,
“दोन-तीन दिवस झाले, सारखी अस्वस्थता आहे... एकदोन कविता नक्की जन्माला येतील असं वाटतं.”

आज नक्की


page26
बळवंतराव रोज बाइकनं आपल्या कामाच्या ठिकाणी जात असत. परंतु काल त्यांची बाइक बंद पडल्यानं त्यांनी एक रिक्षा सांगितली होती. संध्याकाळी सात वाजता रिक्षावाला येणं अपेक्षित होतं. सव्वासात झाले तरी रिक्षावाला आला नाही. तेव्हा बळवंतरावानी रिक्षावाल्याला फोन केला आणि म्हणाले,
“अरे बाबा, मला आठची कोल्हापूर गाडी आहे. इतक्या उशिरा आलास, तर कसा पोहोचेन वेळेवर?”
तेव्हा रिक्षावाला म्हणाला,
“काळजी करू नका. ही कोल्हापूर गाडी नेहमीच लेट होते. आजही ती हमखास लेटच असेल.”
तेव्हा बळवंतराव म्हणाले,
“नेहमीचं मला माहीत नाही, पण आज तर नक्कीच लेट होईल. कारण त्या गाडीचा ड्रायव्हर आज मीच आहे...”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link