Next
आठवडानोंदी
संग्राहक : प्रसाद भडसावळे
Friday, July 05 | 04:00 PM
15 0 0
Share this story


६ जुलै : अर्थशास्त्रज्ञ वि. म. दांडेकर यांच्या जन्मशताब्दीवर्षास प्रारंभ (१९२०) / साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिन (१९२७)/  जागतिक प्राणिजन्य रोगदिन / जलसंपत्तीदिन.


७ जुलै :  संगीतकार अनिल बिश्वास यांचा जन्मदिन (१९१४) / गायिका पद्मजा फेणाणी यांचे ५८व्या वर्षांत पदार्पण (१९६२) / क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याचे ३९व्या वर्षांत पदार्पण (१९८१) / जागतिक चॉकलेटदिन.


८ जुलै :  स्वातंत्र्यवीर सावरकरांची त्रिखंडात गाजलेल्या सागरीउडीचे हे ११०वे वर्ष (१९१०) / दुर्गप्रेमी साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचा जन्मदिन (१९१६) /  राष्ट्रीय साक्षरतादिन / जागतिक अॅलर्जी प्रतिबंधकदिन.


९ जुलै : शिवणयंत्राचे जनक एलियस हॅर्वे यांच्या द्विशताब्दीवर्षाची सांगता (१८१९) / संतवाङ्मयाचे अभ्यासक शं. वा. दांडेकर यांचा स्मृतिदिन (१९६८) / भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघ घोषित, त्यास ५० वर्षे पूर्ण (१९६९) / समाजसेविका साधनाताई आमटे यांचा स्मृतिदिन.


१० जुलै : कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्मदिन (१९१३) / साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्मदिन (१९२३) / निवेदक, लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे ८१ व्या वर्षांत पदार्पण (१९३९) / व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचा स्मृतिदिन / डॉ. मोहन धारिया यांना स्थापन केलेल्या वनराई संस्थेचा स्थापनादिन (१९८६) / भारतीय क्रिकेटवीर सुनील गावसकर यांचे ७१व्या वर्षात पदार्पण (१९४९) / शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना ७०व्या वर्षांत पदार्पण (१९५०) / मातृसुरक्षादिन.


११ जुलै : कथा, कादंबरीकार ना. ह. आपटे यांचा जन्मदिन (१८८९) / अमेरिकेची ‘स्कायलॅब’ हिंदी महासागरात कोसळली. या घटनेस ४० वर्षे पूर्ण (१९७९) / कथा, कादंबरीकार शंकरराव खरात यांचा ९९वा जन्मदिन (१९२१) / रहस्यकथाकार सुहास शिरवळकर यांचा स्मृतिदिन (२००३) /  विश्व जनसंख्यादिन.


१२ जुलै : संत सावतामाळी जयंती (१२९५) / प्रतिथयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा १११वा जन्मदिन (१९०९) /  कादंबरीकार मनोहर माळगावकर यांचा जन्मदिन (१९१३) / सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या जन्मशताब्दीवर्षास प्रारंभ (१९२०) / पानशेत धरण फुटल्याने पुणे शहराला महापूराचा तडाखा. या घटनेस ६८ वर्षे पूर्ण (१९६१) / अभिनेता प्राण यांचा सहावा स्मृतिदिन (२०१३) / आषाढी एकादशी.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link