Next
कबड्डीचा तुफानी झंझावात
विशेष प्रतिनिधी
Friday, November 16 | 04:00 PM
15 0 0
Share this storyग्रामीण भागात ओळखल्या जाणाऱ्या कबड्डी खेळाला प्रो कबड्डी लीगमुळे मोठ्या लोकप्रियेतबरोबरच जबरदस्त ग्लॅमरलही प्राप्त झालं आहे. आतापर्यंत प्रो कबड्डीचे पाच हंगाम झाले असून सध्या सहाव्या हंगामानं खेळाची उत्कंठा आणखी वाढवली आहे.

यू मुंबा, बेंगळुरू बुल्स, हरयाणा स्टीलर्स, तामिळ थलइवा, पाटणा पायरेट्स, दबंग दिल्ली, बेंगॉल वॉरियर्स, जयपूर पिंक पँथर्स, पुणेरी पलटण, गुजरात फॉर्च्युनजायंटस्, यूपी योद्धा आणि तेलुगू टायटन्स असे बारा संघ आमनेसामने आल्यानं सामन्यांतील रंगत आणि चुरस आता आणखी वाढली आहे.

गावा-खेड्यात लाल मातीत रंगणारा हा खेळ आता थेट मॅटवर खेळला जातोय. कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय पातळीवर नेली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कबड्डीला जागतिक स्तरावर मान्यता आणि प्रतिष्ठा मिळाली. विश्वचषक आणि आशियाई स्पर्धांमध्ये कबड्डीत भारताचाच दबदबा आहे. आता प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीला प्रसिद्धी आणि लोकमान्यतेचं वेगळंच वलय प्राप्त झालं आहे. लीगमुळे तरुणाईमध्ये हा खेळ दिवसेंदिवस लोकप्रिय होण्यास मोठी मदत झाली आहे.

अनुपकुमार, रिशांक देवाडिगा आणि काशिलिंग आडके यांसारख्या खेळाडूंनी आपल्या अफलातून खेळानं कबड्डी घराघरात पोचवली.
प्रो कबड्डी लीगचा पहिला हंगाम २०१४ मध्ये खेळवण्यात आला. पहिल्याच हंगामाला कबड्डीप्रेमींनी लीगला भरभरून प्रतिसाद दिला. त्यावेळी सारेच सामने प्रेक्षकांनी हाऊसफुल केले होते. क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जी गर्दी होते तेवढीच गर्दी या कबड्डीपटूंना पाहण्यासाठी होऊ लागली आहे. प्रो कबड्डी लीगनं कबड्डीला अनेक होतकरू खेळाडू दिले. त्याचप्रमाणे पैसा आणि ग्लॅमर आल्यामुळे कबड्डीपटूंची स्वप्नंही या निमित्तानं पूर्ण होत आहेत.

पूर्वी भारतीय कबड्डी संघाची निवड करताना जेवढे पर्याय होते त्यात आता खूप भर पडली आहे. खेळाडूंच्या निवडीत मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिक गुणी खेळाडूंना संधी मिळत आहे. याचे सारे श्रेय प्रो कबड्डी लीगला जाते. आता तर या प्रो कबड्डी लीगमधील संघांची संख्या आठवरून बारा झाली आहे. यावरूनच कबड्डीची अफाट लोकप्रियता लक्षात येते. लीगच्या पहिल्या हंगामात जे कबड्डीपटू लखपती झाले, ते सहाव्या हंगामात करोडपती झाले
आहेत. यावरून कबड्डीला किती आणि कशी लोकप्रियता मिळत आहे, हे दिसतं.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link