Next
यम द्वितीया - भाऊबीज
दा. कृ. सोमण
Friday, November 02 | 02:25 PM
15 0 0
Share this story

शुक्रवार, ९ नोव्हेंबर रोजी अपराण्हकाली कार्तिक शुक्ल द्वितीया  असल्याने याच दिवशी यमद्वितीया, भाऊबीज आहे. भाऊबीजेचा सण हा बहीण -भावाच्या मायेचा आहे. या दिवशी यम, त्याची बहीण यमी हिच्या घरी भाऊबीजेसाठी गेला होता. या दिवशी यमपूजन करण्यास सांगण्यात आले आहे.
दादाच्या डोक्याला कुंकुमतिलक, अक्षता लावून ताई दादाला ओवाळते.  निरांजनाची काळजी घ्यायला आई असते. बाबानी  ताईला भाऊबीज म्हणून द्यायला दिलेले पाकीट दादा तबकात लगेच ठेवत नाही. पुन्हा पुन्हा ओवाळायला  सांगतो. शेवटी ताईने विनवणी करताच किंवा आईने सांगताच दादा भाऊबीज तबकात ठेवतो. लहानपणची ती भाऊबीज संस्मरणीय असते. मस्ती, भांडणे, वादावादी , अभ्यास यात दरवर्षी येणारा भाऊबीजेचा सण दिवाळीचा आनंद द्विगुणित  करीत असतो.
भाऊबीजेसंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत. अर्थात त्यांचा शब्दश: अर्थ घ्यायचा नाही. फक्त भावार्थ  पाहावयाचा. एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली की “ ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या .” यमदूत अशा माणसाचा शोध घेत पृथ्वीवर फिरू लागले. एका बहिणीला ही बातमी कळली. तिच्या भावाला आजवर कोणीही शिवी दिली नाही हे तिला माहीत होते. मग आपल्या भावाला यमदूत नेऊ नयेत म्हणून ती भावाला शिव्या देत त्याच्या घरी गेली. प्रथम तिच्या माहेरच्या माणसांना वाटले की तिला वेड लागले. पण तिच्या तोंडून वस्तुस्थिती कळताच सर्वांना तिचे कौतुक वाटले. भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस कार्तिक शुक्ल व्दितीयेचा होता. तिथपासून भाऊबीजेचा सण सुरू झाला.
दुसऱ्या एका कथेप्रमाणे, यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला जातात. त्या दिवशी मृत्युमुखी पडलेल्यांना त्या दिवसापुरते जीवदान देतात. भाऊबीज झाली की दिवाळी संपते.  दिवाळीपासून नवी ऊर्जा घेऊन पुन्हा सर्वजण कामाला लागतात. एक चांगली गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते ती ही, की आता पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटू लागले आहे.
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या, लक्षुमणाच्या
लक्ष्मण कुणाचा, आईबापाचा !
हे गीत तुमच्या अनेकवेळा कानावरून गेले असेल. दिवाळीउत्सव हा केवळ धार्मिक राहिलेला नाही. तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक बनला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळीसण हा सणांचा राजा बनला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link