Next
रिस्पेक्ट
संदेश कुलकर्णी
Friday, October 19 | 04:00 PM
15 0 0
Share this storyसौमित्रनं मला हे सांगताच मला इतका आनंद झाला की मी उठून त्याला मिठी मारून हवेत उचललं. तो हसत ‘नीचे उतारो’ म्हणत राहिला. मी बराच वेळ त्याला तसाच फिरवला आणि मग त्याला अलगद जमिनीवर उतरवून घट्ट मिठी मारली आणि वेड्यासारखा त्याचा चेहरा दोन्ही हातात पकडून डोळ्यांत बघत “सच बता रहे हो?” असं विचारात राहिलो. तो हसून म्हणाला, “हां भाई हां. पारुल लेस्बियन है, पर तुम मुझसे जो बर्ताव कर रहे हो उससे लोगों को लग रहा है की हम गे है.” मी पाहिलं तर खरंच दोन-तीन जण आपल्या टेबलावरून वळून आमच्याकडे बघत होते. मी त्यांच्याकडे पाहत जोरात ओरडलो, “हां हम गे है और अब वो कानुनी जुर्म नही है!” सौमित्र जोरात हसला आणि म्हणाला, “बस करो. बैठो.” मी म्हणालो, “नाही, आता मला बसवणार नाही. मी असाच जातो आणि प्राजक्ताला भेटून हे लगेच सांगतो.” सौमित्रनं मला जबरदस्तीनं खाली बसवलं आणि म्हणाला, “तू हाय आहेस. आधी मी काय बोलते ते ऐक! महत्त्वपूर्ण बात बता रहा हूं.”

मी बसल्यावर तो माझ्या डोळ्यांत खोल पाहून म्हणाला, “तू प्राजक्तासे सचमुच प्यार करता है?” मी फिल्मी पद्धतीनं म्हणालो, “दिल चीर के दिखाऊ क्या? हनुमानासारखी छाती फाडू का?” त्यानं मला थांबवलं आणि म्हणाला, “तो तू उसे छोड दे!” माझे डोळे कार्टून फिल्ममध्ये दाखवतात तसे झटक्यात बाहेर आले. ‘भौचक्का’ ह्या शब्दाचा अर्थ अचानक लक्षात आला. मी त्याला विचारलं, “सटकला आहेस का?” त्यानं मला शांत व्हायला अवधी दिला आणि तो म्हणाला, “उसे जकडने की कोशिश मत करो. सेट हर फ्री. ट्रू लव गिव्स फ्रीडम.” मी विचार केला आणि म्हणालो, “खरं सांगू का सौमित्र? मला तसं वागायला आवडेल. पण ती नसली तर काय होईल ह्या कल्पनेनं खूप बोअर होतं. तिच्याशिवाय जगून काही उपयोग नाही असं वाटतं.” सौमित्र म्हणाला, “तो फिर उसको भगाके ले के आओ.” मी म्हणालो, “त्याला काहीच अर्थ नाही. ती जबरदस्ती होईल ना?

तिला आपणाहून वाटलं पाहिजे!” सौमित्र हसून म्हणाला, “तो मैं क्या ग्रीक या लॅटिन में बात कर रहा था?” मी विचार केला आणि म्हणालो, “पण तिला वाटलं नाही तर?” त्यानं प्रेमानं माझ्याकडे पाहिलं आणि केसातून हात फिरवला. “हमे लगता है जिंदगी रुक जाती है. पर नही. जिंदगी नया मोड लेती है.”
मी त्याच्या बोलण्याचा बराच वेळ शांतपणे विचार करत राहिलो. थोड्या वेळानं तो म्हणाला, “चलो भाई कल प्रेझेन्टेशन की तैयारी करनी है मुझे. मै निकलता हूं.” मी म्हणालो, “तुम? मीपण येतो ना?” तो म्हणाला, “तुमने जॉब छोडा है ना?” मला आठवलं की मला राजीनामा द्यायचा आहे असं मी त्याला म्हणालो होतो. मला माझीच लाज वाटली. मी त्याला म्हणालो, “सॉरी, पण तुझ्याशी बोलल्यावर मला तसं वाटत नाहीये.” तो म्हणाला, “ग्रेट! चलो फिर गुरू, हो जाओ शुरू!”  आम्ही रेस्टॉरंटमधून बाहेर आलो आणि गाडीत बसलो तेव्हा सौमित्र म्हणाला, “देखा? मैंने तुम्हे फर्म छोडनेसे रोका नही था. अगर तुम वापस नही आते तो भी मैं तुम्हारे फ्रीडम का रिस्पेक्ट करता. सच्चे प्यार में वैसा ही करना है दोस्त. सामनेवाले का रिस्पेक्ट.” मी भारावून त्याच्याकडे पाहत होतो. मी त्याला विचारलं, त्याला हे कसं काय कळलं सगळं? तो हसून म्हणाला, “एकस्पिरीअन्स भाई! ठोकर खाने के बाद ही समझदारी आती है. पहले हमे जो लगता है ना?- के हमें सब पता है, वो खाली इन्फर्मेशन होती है.” मी त्याला विचारलं, “तो तुम अकेले रहते हो?” तो हसून म्हणाला, “नही यार. उसके बाद शादी की. प्यारी सी बिवी है, दो साल का बेटा है. रजनी, चलती का नाम गाडी. रुकना मतलब मौत. पर अब बस! एक दिन के लिये बहोत फिलॉसाफी हो गई.” 

मग त्या रात्री मी, सौमित्र आणि पारुलनं मिळून प्रेझेन्टेशनची तयारी केली. उशीर होणार हे सांगायला घरी फोन केला. बाबांनी घेतला. ते म्हणाले, “तू हे आईला सांग, मला सांगू नकोस.” मी बाबांची खेचली, “अहो बाबा, मी तुमचाही मुलगा आहे ना? मग तुम्हाला सांगितलं तर काय हरकत आहे?” बाबांनी माझ्या विनोदाला फारसा डिमांड दिला नाही आणि आईला हाक मारत म्हणाले, “अग एss पुष्पा, हा जेवायला नाहीए म्हणतोय.” त्यांनी माझा प्रश्न टाळल्यानं मला चेव चढला आणि मी म्हणालो, “अहो बाबा, आई येईपर्यंत बोला की माझ्याशी. फक्त कामापुरतं बोलायला मी काही तुमच्या ऑफिसमधला प्युन आहे का?” बाबा म्हणाले, “हो प्युन नाहीस हे माहीत आहे, पण पिऊन नाहीएस ना?” मी खुश झालो. म्हणालो, “बाबा, वा वा वा! तुम्ही हा विनोद केल्यामुळे माझ्या मनातला तुमच्याविषयीचा आदर दुणावला आहे. आता मला सांगा तुम्हाला आईविषयी आदर वाटतो का?” बाबा क्लीन बोल्ड झाले!  “काय?” त्यांनी कन्फ्युज होऊन विचारलं. मी म्हणालो, “रिस्पेक्ट, रिस्पेक्ट! डू यु रिस्पेक्ट युवर वाईफ?” तेवढ्यात आई आली “काय झालं? द्या इकडे फोन.”  मी म्हणालो, “बाबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन मग आईला फोन द्या.” तिकडून आई म्हणाली, “अहो द्या की इकडे? नुसते पुतळ्यासारखे काय उभे आहात?” बाबा आईकडे फोन देता देता म्हणाले, “काहीही बरळतो हा मुलगा.”

आई फोनवर आल्यावर मी तिलाही विचारलं, “आई, तू बाबांचा आदर करतेस का? आई माझ्यावर खेकसलीच. “हे असले फालतू प्रश्न विचारायला फोन केलास. मी कामात आहे. ठेवते.” मी घाईनं आईला म्हणालो, “आई-आई. हे फालतू नाहीये. हाच मुलभूत प्रश्न आहे. तुमच्या नात्याचा पाया किती घट्ट आहे हे त्यामुळे लक्षात येईल.” आईनं अचानक नूर बदलला “बाळा, मी खरंच कामात आहे रे.. पिलूमावशी आणि तिची फॅमिली जेवायला येणार आहेत. तेल तापवायला ठेवलंय आणि करंज्या तळायच्या आहेत. तू लवकर ये जेवायच्या वेळी.” मी हताश होऊन म्हणालो, “आई, तेच सांगायला फोन केला होता. आज उशीर होणार आहे. अचानक काम आलंय.” आई म्हणाली, “बरं. मग तुझ्या वाटणीच्या आधीच काढून ठेवते. तिचा नातू भलताच खादाड आहे. आणि हो रजनी, कामाच्या नावाखाली दारू पिऊ नकोस. पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेणार नाही तुला.” तिनं फोन ठेवून दिला. बाबांना वाटो ना वाटो, माझ्या मनातील आईचा रिस्पेक्ट वाढला. जगात इतकं थेट कोणी बोलू शकत असेल असं मला वाटत नाही. 

मग मी इमाने इतबारे कामाला लागलो आणि सौमित्रला हवं असलेलं लेखन पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी सौमित्रनं ते प्रेझेन्टेशन दिलं आणि फर्मसाठी मोठ्ठी ऑफर मिळाली. त्यामुळे पुढचे काही दिवस त्या कामाच्या गडबडीत गेले. प्राजक्ताची सारखी आठवण यायची, पण सौमित्रचे शब्द आठवून मी तिला फोन केला नाही किंवा मेसेजही केला नाही. तरी एक पोकळी जाणवत राहायची. शेवटी एकदा न राहवून मी तिला मेसेज केला ‘आय रिस्पेक्ट यू.’ तिचं त्यावर काही उत्तर आलं नाही.

रजनी म्हणे कठीण, प्रेमात स्वीकारणे नकार
आड येई आदराच्या, ताठ मान अहंकार!
क्रमश: 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link