Next
मनाचा ठाव घेणारे एक रिफ्रेशिंग नाटक!
हर्षित म्हात्रे
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this story‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे साधारणतः जगातील सगळ्या घरात सगळ्या बहिणींनीं आपल्या लाडक्या हक्काच्या भावाला उच्चारलेले वाक्य. गुड न्यूज.. हो म्हणजे तीच कल्पना जी गुड न्यूज म्हटल्यावर आपल्याला वाटते. बहिणीचे लग्न झाल्यावर तिच्या प्रेग्नंन्सीच्या गुड न्यूजची. बहिणीच्या गुड न्यूजची तिचा लाडका भाऊ आणि घरातील सगळेच आतुरतेनं वाट पाहत असतात. कारण तो क्षण नक्कीच आनंदाचा असतो...  पहिलं लग्न आणि मग त्यामागे आलेली ती गुड न्यूज! हे अगदी ठरलेले असतं. समजा, या गोष्टीचा हा क्रम चुकून आधी गुड न्यूज आणि मग लग्न, असं झालं तर? 

पचवायला जरा कठीण आहे ना? आधीच्या पिढीला नक्कीच कठीण आहे, परंतु ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा मुख्य गाभा आहे हाच आहे. चुकीचा की बरोबर यात न पडता त्या न्यूजच्या पाठी येणाऱ्या गोष्टी, अनुभव, जबाबदाऱ्या, गोष्टी हाताळण्याच्या पद्धती, या बातमीनंतर नात्यात घडणारे चढउतार, त्यांच्यात होणारी भांडणं आणि त्यातून उभे राहिलेली काळजी आणि भावाबहिणींचं एकमेकांवर असलेलं निखळ प्रेम  या गोष्टींचा अतिशय बारकाईनं अभ्यास करून लेखक आणि दिग्दर्शकानं उभे केलेलं हे नाटक नाट्यप्रेमींसाठी मेजवानी आहे. आजच्या पिढीचं ‘किशोरवयीन गर्भधारणा’ या विषयावर काय म्हणणं असू शकतं किंवा काय म्हणणं आहे हे सांगणार हे आजच्या काळातील नाटक. लग्नाअगोदर आपली बहीण प्रेग्नंट झाली तर किती भाऊ तिचा स्वीकार करतील? त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतील? ‘फुलों का तारोंका सब का कहना है , एक हजारोंमे मेरी बहेना है , सारी उमर हमे संग रहेना है ..’ असं गाणारे किती भाऊ अशा परिस्थितीत बहिणीची जिवापाड काळजी घेतील? बहिणीनं हा निर्णय का घेतला असेल या गोष्टीचा विचार करून तिला समजून घेत तिच्या निर्णयावर विश्वास ठेवत, समाजाच्या विरोधाला न जुमानता बहिणीचा सांभाळ करतील का? असे विचार मांडत हे नाटक प्रेक्षकाला विचारप्रवृत्त करते.

कल्याणी पाठारे लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातून ‘किशोरवयीन गर्भधारणा’ हा अतिशय संवेदनशील विषय हाताळण्यात आला आहे.  विनीत म्हणजे उमेश कामत आणि त्याची बहीण म्हणजे ऋता दुर्गुळे या दोघांच्या अदाकारीनं आणि त्याचबरोबर आरती मोरे आणि रिशी मनोहर यांच्या साथीनं घडलेलं एक उत्तम नाटक आहे. विषय नाजूक आहे किंवा वेगळा आहे यापेक्षा कोणताही विषय कसा हाताळला गेला पाहिजे हे आजच्या पिढीला समजलं आहे किंवा नाही या िषयावर हे नाटक प्रभावीपणे भाष्य करतं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link