Next
महर्षी धोंडो केशव कर्वे
- नरेंद्र शंकर घाटे (संस्कार भारती)
Friday, April 12 | 03:30 PM
15 0 0
Share this story

मुरुड गावातल्या पाच मुलांना इंग्रजी चौथीची परीक्षा द्यायला सातारला जायचे होते. तेव्हा मुरुडच्या शाळेत चौथीचा वर्गच नव्हता. घरी अभ्यास पूर्ण करून परीक्षेला मुंबई किंवा साताऱ्याला जावं लागे. पाऊस मी म्हणत होता! समुद्राला उधाण आल्यामुळे मुरुडहून मुंबईला जाणारी बोट रद्द झाली होती. आता मुलांपुढे एकच पर्याय होता. सातारला पायी जाण्याचा! अंदाजे दीडशे किलोमीटर अंतर, भर पावसात मुलं तिसऱ्या दिवशी साताऱ्याला पोहचली. तोपर्यंत परीक्षेची वेळ संपली होती. सातारच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे मध्यस्थी करून परीक्षेसाठी परवानगी मिळवली. शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येकाला निरखून पाहिलं. त्या काळात इंग्रजी चौथीच्या परीक्षेसाठी सतरा वर्षे पूर्ण लागायची. मात्र त्यांच्यातला एक मुलगा अगदी हडकुळा आणि लहान दिसत असल्याने, सतरा वर्षांचा वाटत नाही असे सांगून त्याला परीक्षा देण्यास मनाई केली. हेच १८ एप्रिल, १८५८ रोजी मुरुड गावी जन्मलेले धोंडो केशव कर्वे. पुढे ते गणित विषयात बीए झाले.
बालमित्रांनो, आज मुलींनी शिक्षणामुळे सर्व क्षेत्रांत आपलं स्थान पक्के केले आहे. पण दीडशे वर्षांपूर्वी आपल्या देशात स्त्रीशिक्षण नव्हतेच. स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणणाऱ्यांमध्ये अग्रणी होते महर्षी अण्णासाहेब कर्वे. या कार्याला आपल्या पत्नीपासूनच सुरुवात करून पुढे त्यांनी “सर नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विश्वविद्यालयाची” सुरूवात केली. आज या संस्थेचे खूप मोठे नाव आहे. अण्णांना, त्यांच्या स्त्रीशिक्षणातील योगदानासाठी १९५८ साली भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. ९ नोव्हेंबर १९६२ रोजी वयाची १०४ वर्षे पूर्ण करून या ऋषितुल्य व्यक्तीची प्राणज्योत मालवली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link