Next
वर्णन करणारे शब्द
रेणू दांडेकर
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story


एखाद्या गोष्टीचं, ठिकाणाचं, व्यक्तीचं वर्णन करायला अनेक शब्दांची मदत घ्यावी लागते. मग आई, बाबा, शाळा, मित्र, नदी, ऊन असा कोणताही शब्द असो. जितके शब्द आपण वापरू तितकं ते  वर्णन रंगत जातं. त्याची सवय करायला हवी. भाषेत अशा शब्दांना काय म्हणतात, ते माहीत आहे नं तुम्हाला?
उदाहरणार्थ, पाऊस. पावसाचं वर्णन कोणत्या शब्दांत करता येईल? ही यादी पाहा- रिमझिम, जोराचा, वेडावाकडा, टपटप, कंटाळवाणा, धोधो, बदाबदा, रडका, गारांचा, रिपरिप, मोठा, इत्यादी...
या सर्व शब्दांचे अर्थ डोळ्यांपुढे आणून बघा. असे आणखी कोणते शब्द वापरता येतील पावसाचं वर्णन करायला? आता या शब्दांची वाक्यं करा. उदाहरणार्थ, रिमझिम पाऊस पडू लागला. पाऊस धोधो कोसळत असल्याने आम्ही बाहेर पडू शकलो नाही.
हाच खेळ शाळा, घर, मित्र, गाव, आईबाबा असे शब्द वापरून खेळा. अनेक जण असाल तर प्रत्येकानं एकेक शब्द सांगा. त्या शब्दाचं वर्णन करणारं वाक्य तयार करा. अशाने अनेक नवीन शब्द आठवतील. ते वापरायची सवय लागेल. नाहीतारे आपण अनेकदा तीच तीच विशेषणं वापरतो. कशालाही सुंदर आणि छान! पण वेगवेगळ्या विशेषणांच्या छटा वापरल्या की आपली भाषा संपन्न होत जाते. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link