Next
मधुर सरोद
- मोहन कान्हेरे
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सरोद या वाद्याचा इतिहास रोचक आहे. आपल्याकडे राजे महाराजे या वाद्याचे चाहते होते. राजा समुद्रगुप्त स्वत: हे वाद्य वाजवत असे. त्या काळातल्या नाण्यांवर तसं चित्र पाहायला मिळतं. तमिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांत फार पूर्वी ‘स्वारबट’ नावाचं वाद्य प्रचारात होतं जे काहीसं सरोदशी मिळतंजुळतं होतं. शारदीय वीणेत बदल होत होत स्वारबट किंवा सरोद बनलं, असं मानतात.
अफगाणिस्तानातील ‘रबाब’ हे वाद्य सरोदच्या आधीचं! तेव्हा सरोदचा उगम अफगाणिस्तानमध्ये आहे, असंही म्हटलं जातं.
‘भारतीय संगीत वादन’ हे लालमणी मिश्रा यांचं पुस्तक आहे, त्यात ते म्हणतात, ‘प्राचीन चित्रा (चित्र) वीणा, मध्ययुगीन रब आणि त्यानंतरचं सूरसिंगार यांचा मधुर संयोग म्हणजे सरोद हे वाद्य आहे.’
अमजद अली खान यांचे पूर्वज महम्मद हाशमी खान बंगश स्वत: संगीतकार होते. घोडा-व्यापारीही होते, असं विकिपीडियानं नमूद केलं आहे. १८ व्या शतकात ते हिंदुस्तानात आले. मध्यप्रदेशातील रेवा (रीवाही म्हणतात) संस्थानात दरबारी संगीतकार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांचा नातू गुलाम अली खान बंगश यांनी सरोद वाद्य निर्माण केलं, असंही मानलं जातं.
सरोदची किंमत ३८ ते ४० हजार रुपये असते. या वाद्याला अंगभूत सौंदर्य आहे. चार मुख्य तारा, दोन चिकारीच्या तारा आणि १५ sympathetic तारा! (सहानुभुतीच्या तारा असंही म्हणतात!) स्वरमंडलाप्रमाणे या १५ तारा मधुर ध्वनीची निर्मिती करतात. सतारीला पडदे असतात (स्वर स्थानं) मात्र सरोदला नसतात. वादकाला स्वरस्थानं अनुभवानं, अभ्यासानं माहीत होतात. अल्लाउद्दीन खान, अली अकबर खान, बुद्धदेव दासगुप्ता, शरत राणी, झरीन दारूवाला, राधिकामोहन मैत्रा (मोइत्रा- असाही उच्चार करतात) पं. ब्रिजनारायण, अर्णव चक्रवर्ती अशीही या सरोद वादकांची काही नावं!
(सरोद वादनाच्या साहाय्यानं तन-मनावर परिणाम करण्याचे प्रयोग करणारे पं. विवेक जोशी यांनी या लेखासाठी महत्त्वाची माहिती पुरवली आहे.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link