Next
आली बघ गाई गाई
- डॉ. नीलिमा गुंडी
Friday, January 11 | 03:00 PM
15 0 0
Share this story

लहान मुलांसाठी अंगाईगीते म्हटली जातात. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्याशी कवितेची लय त्यातून जुळत जात असते. झोप येण्यासाठी लहान मुलाला जोजवायचे असते. त्यासाठी कधी पाळणा वापरतात, तर कधी आईची मांडीही चालते . त्या लयीच्या हिंदोळ्यावर गुंगून जात बाळ झोपी जाते. त्यासाठी या कविता अर्थातच गेय असतात. मुलांना त्या कळण्याची शक्यता नसते. तरीही त्यातून आई आणि मूल यांचा संवाद एकप्रकारे चालू राहतो. आपल्याकडे देवादिकांचे पाळणेही मुलांसाठी म्हटले जातात. ‘बाळा, जो जो रे, कुलभूषणा, दशरथनंदना’ हा रामाचा पाळणा प्रसिद्ध आहे. तसेच ‘गुणी बाळ असा, जागसी का रे वाया, नीज रे नीज शिवराया’ हा बाल शिवाजीचा पाळणाही प्रसिद्ध आहे. एका जुन्या चित्रपटातलं एक अंगाईगीत आठवतं. ते असं आहे, ‘नीज रे श्रीहरी, चांदणे मोहरू/ नंदराणी तुला गातसे हल्लरू’ यातला ‘हल्लरु’ हा शब्द जुन्या काळी अंगाईगीतासाठी वापरात होता.
मंगेश पाडगावकर यांच्या, ‘नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे’ या गाण्यात शांत वातावरण छान टिपले आहे. इंदिरा संत यांच्या कवितेतल्या या ओळी पाहा, ‘आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ, लाविले का अवधान? ऐकावया त्यांचा ताल.’ ही कल्पना किती छान आहे! बालकवींची एक छोटीशी कविता आहे, ‘बोल बाई बोल ग, तुझ्या बोलाचे काय वानू मोल ग? डोल बाई डोल ग, जाईजुईची लाख फुले तोल ग; हास बाई हास ग, माझ्या अंगणी माणिकांची रास ग; नीज बाई नीज ग, गाई अंगाई, काऊचिऊ तुज ग “ अशा शब्दांच्या तालावर बाळ झोपी जातं, मात्र त्याच्या मनात सूर आणि शब्द खोलवर झिरपत राहतात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link