Next
दिवाळीत रंगणार डावपेचांची दंगल
प्रतिनिधी
Friday, October 12 | 03:00 PM
15 0 0
Share this storyऐन दिवाळीत महाराष्ट्रात कुस्तीची दंगल होणार आहे. कुस्ती हा महाराष्ट्राचा अस्सल मातीतला रांगडा खेळ आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘झी टॉकीज’च्या विद्यमाने ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’चे आयोजन करण्यात आले आहे. २ नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही कुस्तीची दंगल १८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे आणि याचे थेट प्रक्षेपण ‘झी टॉकीज’वर रोज संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. त्यामुळे ज्यांना कुस्तीची प्रत्यक्ष दंगल पाहणे शक्य होणार नाही, त्यांना घरबसल्या आनंद घेता येईल.पुण्याच्या बालेवाडीत रंगणाऱ्या ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीगिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगिरांशी लढताना बघण्याची पर्वणी तमाम मराठीजनांना मिळणार आहे. पिस्तुल्या, फँड्री व सैराट अशा हटके चित्रपटांचे दिग्दर्शक करणारे नागराज मंजुळे यांनी झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’चा प्रोमो दिग्दर्शित केला असून त्यात अभिनयदेखील केला आहे. मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेतेही आहेत. या प्रोमोच्या निमित्ताने ते ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.

उत्कंठा हा कुस्ती या खेळाचा श्वास आहे. पैलवानांनी शड्डू ठोकल्यापासून चितपट करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाढणारी ही उत्कंठा ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’मध्ये सर्वांना पाहता आणि अनुभवता येणार आहे. हा थरार आवर्जून पाहा, असे आवाहन ‘झी टॉकीज’ व ‘झी युवा’चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी केले आहे. नागराज मंजुळे यांनी ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’साठी योगदान देणे ही ‘झी टॉकीज’ आणि प्रेक्षकांसाठी भाग्याची गोष्ट आहे, या शब्दांत त्यांनी मंजुळे यांचे कौतुक केले आहे.प्रोमोसुद्धा आवडेल
‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’शी जोडलं जाऊन त्याचा प्रोमो दिग्दर्शित केल्याचा मला खरंच खूप आनंद झाला आहे. माझ्या कामावर आजवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं आहे आणि त्यांना हा प्रोमोसुद्धा आवडेल, अशी आशा व्यक्त करतो.
- नागराज मंजुळे, दिग्दर्शक
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link