Next
'स्माईल प्लीज'च्या अँथम सॉन्गमध्ये ३० कलाकारांचा सहभाग
विशेष प्रतिनिधी
Friday, July 05 | 04:45 AM
15 0 0
Share this story


 'स्माईल प्लीज' चित्रपटाचे अँथम सॉन्ग नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. ‘चल पुढे चाल तू’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीतील तीस हून अधिक नावाजलेले कलाकार एकत्र आले आहेत. हिंदीनंतर मराठी गाण्यात होणारा बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा.  

'चल पुढे चाल तू वाट ही आपली' असे म्हणत सर्वच कलाकार प्रेक्षकांना जगण्याची एक नवी ऊर्जा देत आहेत. जीवन जगताना सर्वांसमोर रोज एक नवीन आव्हान उभे असते, असे असले तरी आपण आपले जगणे सोडत नाही.  कधी आव्हानांवर यशस्वीरित्या मात करून तर कधी अपयशी होऊन आपण जगतच असतो. अशाच आपल्या जगण्याला एक नवीन प्रेरणा, नवीन उमेद  देणारे हे गाणे आहे.  या गाण्यात उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकर, भूषण प्रधान, चिन्मय मांडलेकर, चिन्मयी सुमीत, रेणुका शहाणे, हर्षदा खानविलकर, शरद केळकर, मेघा धाडे, सिद्धार्थ चांदेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, प्रार्थना बेहेरे, प्रिया बापट, उमेश कामत, पुष्कर श्रोत्री, सचिन पिळगावकर, सई लोकूर, मिताली मयेकर, सागरिका घाटगे, श्रिया पिळगावकर, सोनाली खरे, स्पृहा जोशी, तेजस्विनी पंडित, मानसी नाईक, वैभव तत्ववादी यांच्यासोबतच मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, आदिती गोवित्रीकर, बॉस्को - सिझर, रोहन गोखले, रोहन प्रधान आणि विक्रम फडणीस हे कलाकार आहेत. 

हे गाणे अवघ्या एका दिवसात चित्रित केले आहे. विक्रम फडणीस यांनी या गाण्याबद्दलची कल्पना जेव्हा या सर्व कलाकारांना सांगितली तेव्हा एका झटक्यात सगळ्यांनी होकार दिला.इतकेच नाही तर त्यांनी या गाण्याच्या चित्रीकरणासाठी खूप छान सहकार्यही केले.  जे लोकं जगण्यासाठी संघर्ष करतात अशा लोकांना हे गाणे समर्पित करण्यात आले आहे.   गीताचे लेखन मंदार चोळकर यांनी केले असून रोहन - रोहन यांनी संगीतबद्ध केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत नृत्यदिग्दर्शक बॉस्को-सिझर यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. 'स्माईल प्लीज' हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.


LINK : - https://www.youtube.com/watch?v=T3CnzmpBWXc&feature=youtu.be
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link