Next
गोष्ट रचा!
- रेणू दांडेकर
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

गेल्या आठवड्यात तुम्ही वाक्यं पूर्ण केलीत. आज सगळ्यांना मिळून एक गोष्ट लिहायचीय. एकानं कुणीतरी वही आणा किंवा फळाही चालेल. तोंडी मात्र नाही खेळता यायचं. कारण लक्षात कशी ठेवणार सगळ्यांची वाक्यं? म्हणूनच कागद, फळा, टॅब किंवा लॅपटॉप असे लेखनसाहित्य हवेच.
आधी एक मुलगा/मुलगी एका वाक्यानं सुरुवात करेल. म्हणजे असं एक वाक्य लिहेल की ज्यावर आधारित, ज्याच्याशी संबंधित दुसरं वाक्य लिहिता येइल. शिवाय, एक लक्षात ठेवायचं, की भूतकाळ वापरायचा. उदाहरणार्थ, ‘एक गाव होतं.’ म्हणजे मुख्य म्हणजे घटना तयार व्हायला हवी. आपण ऐकलेल्या गोष्टी आठवून पाहा. काय काय घडत राहतं, पुढे काय होणार, याची उत्सुकता असते नं गोष्ट ऐकताना किंवा वाचताना. आपली गोष्टही तशीच तयार व्हायला हवी.
जास्त जण असतील तर गट तयार करा. आपल्यापैकी एक जण पहिलं वाक्य वहीत लिहील. उदाहरणार्थ, पहिला विद्यार्थी लिहील- ‘रविवारचा दिवस होता.’ मग दुसरा मुलगा तीच वही घेऊन त्यापुढे दुसरं वाक्य लिहील. कधीकधी नुसतीच वाक्यं लिहिली जातात. असं झालं तर वही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल वर्णन नाही यात, त्यामुळे गोष्ट तयारच नाही झाली. गोष्ट तयार करायची म्हणजे त्यात काय काय हवं, याचा विचार करा. गटातील सर्वांनी एकमेकांची वाक्यं वाचून मग स्वत:चं वाक्य लिहा. त्या वाक्यांत वर्णनं, भावना, उत्कंठापूर्ण अशी वाक्यं रचत जा. गटानं मिळून गोष्ट पूर्ण करा. नंतर या गोष्टी वाचा... खूप मजा येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link