Next
एम. एस. सुब्बुलक्ष्मी
- वीणा सामंत (संस्कार भारती)
Friday, August 30 | 03:30 PM
15 0 0
Share this story

जरतारी रेशमी साडी, नाकामध्ये लखलखणारी हिऱ्याची नथ, मानेवरचा अंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा, एडनबर्गमधल्या सुटाबुटातल्या युरोपीयन प्रेक्षकांना हिंदुस्थानी वेशभूषेतील या गायिकेविषयी कमालीची उत्सुकता होती.
वर्ष १९६२, परदेशामध्ये ‘कर्नाटक संगीत’ सादर करण्याचा गायिकेचा पहिलाच प्रसंग. देश, श्रोते, भाषा सारंच अनोळखी. गायिकेला वाटणारी अस्वस्थता शांत चेहऱ्यामागे लपली होती. परंतु एडनबर्ग उत्सवाचे संचालक लॉर्ड हेरवूड यांना गायिकेच्या प्रतिभेवर कमालीचा विश्वास होता, म्हणूनच लॉर्ड हेरवूड यांनी गायिकेला भारतातून कार्यक्रमासाठी मानाचे निमंत्रण दिले होते.
गायिकेने गायला सुरुवात केली आणि चमत्कार झाला. भाषेची बंधने झुगारीत कर्नाटकी संगीताने विदेशी श्रोत्यांना आपलेसे केले. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह भरून गेले. हिंदुस्थानी कर्नाटकी संगीताने जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच आपले स्थान निर्माण केले.
परदेशी श्रोत्यांना मोहात पाडणारा तो सुरेल आवाज होता, मदुरै शंमुखावदिवु सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा. त्यांच्या आवाजातील दैवी गोडवा, स्पष्ट शब्दोच्चार आणि निर्दोष गायकी यामुळे त्यांनी, जागतिक गायनक्षेत्रामध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच भारतरत्न लता मंगेशकरसुद्धा आदराने; सुब्बुलक्ष्मी यांना ‘तपस्विनी’ म्हणतात.
जवळपास वयाची ६० वर्षे सुब्बुलक्ष्मी यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे देशविदेशांमध्ये अनेक कार्यक्रम केले आहेत. संगीताच्या कार्यक्रमांमधून जमा झालेला निधी, सुब्बुलक्ष्मी चांगल्या कामांसाठी दान करीत असत. त्यांच्या या महान कार्यामुळे, अनेक श्रोते सुब्बुलक्ष्मी यांचे भक्त झाले आहेत.
‘भारतरत्न’ आणि ‘रमन मॅगसेसे’ हे सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सुब्बुलक्ष्मी गायनक्षेत्रातील पहिल्या महान व्यक्ती आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link