Next
गुरुनाथची निघणार धिंड
विशेष प्रतिनिधी
Friday, July 05 | 02:15 PM
15 0 0
Share this story

गुरुनाथची निघणार धिंड 
चांगल्या वाईट कृत्याची फळे येथेच भोगावी लागतात. याची प्रचिती ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये लवकरच येणार आहे. सुस्वभावी राधिकाचा गुरुनाथने विश्वासघात केला. राधिकाला त्रास देण्याची एकही संधी त्याने सोडली नाही. राधिकाने मात्र या सगळ्या गोष्टींना धैर्याने तोंड दिले. स्मृतिभ्रंशाचे नाटक करत गुरुनाथ पुन्हा सगळ्यांचा विश्वासघात करत आहे. परंतु त्याचे हे नाटक राधिकाला कळून चुकले असून, तिच्या संयमाचा बांध फुटला आहे. गुरुने केलेल्या चुकांची, त्याने केलेल्या विश्वासघाताची जाणीव त्याला व्हावी म्हणून राधिका आपल्या सासूच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गुरुनाथला शिक्षा देणार आहे. ही शिक्षा पत्नीला फसवणाऱ्या  पुरुषांसाठी चांगलाच धडा ठरणार आहे. राधिकाने आजवर सोसलेल्या दुःखांचा, सहन केलेल्या अपमानाचा ही शिक्षा सूड असेल. त्यानंतर  राधिकाचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी आठ वाजता फक्त ‘झी मराठी’वर! 

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़


तेजश्री म्हणते ‘अग्गंबाई सासूबाई’   

‘तुला पाहते रे’ मालिका २० जुलैला प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. आता त्या जागेवर कोणती नवीन मालिका येणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना आहे. ही उत्सुकता आता संपली असून ‘झी मराठी’ने  ‘अग्गंबाई सासूबाई’या नवीन मालिकेची घोषणा केली आहे. ही मालिका २२ जुलैपासून रात्री साडेआठ वाजता दाखवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो ‘झी मराठी’च्या सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘लग्न सासूचं....करवली सुनबाई, अग्गंबाई सासूबाई..!’ अशा कॅप्शनसहीत हा प्रोमो शेअर करण्यात आला असून यात सासू-सूनेच्या नात्याची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

‘अग्गंबाई सासूबाई’ या नवीन मालिकेतून ‘होणार सून मी…’ मधून आदर्श सून म्हणून लोकप्रिय झालेली तेजश्री प्रधान पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. तेजश्रीसोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत सुनेच्या भूमिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान असून सासूच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आहेत. 

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

वारीमध्ये ‘झी टॉकीज’चाही सहभाग


पंढरपूरकडे निघणारी वारी, ही महाराष्ट्रातील संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. उभ्या महाराष्ट्रातून विठू माऊलीचे भक्त पंढरपूरकडे प्रस्थान करतात. पायी पंढरपूर गाठणाऱ्या या वारकऱ्यांना ओढ असते ती फक्त विठ्ठल भेटीची! अशा विठ्ठल भक्तांसाठी ‘झी टॉकीज’तर्फे वारीमार्गात काही सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. 

वारीमध्ये वारकरी सातत्याने विठू नामाचा जप करत असतात.  त्यांची विठ्ठलाप्रती असलेले प्रेम लक्षात घेऊन, ‘झी टॉकीज’तर्फे वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी कीर्तन करण्यासाठी जागेची व्यवस्था केली आहे. तीन लाख आरतीसंग्रहांचे वाटप ‘झी टॉकीज’ने केले आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाण्याचे टँकर या मार्गावर उपलब्ध करून देण्याचे कामही वाहिनीने हाती घेतले आहे. ‘झी टॉकीज’ने वारीमार्गांत ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्रे उभारली असून तिथे वारकऱ्यांना वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. ‘झी टॉकीज’वरून प्रसारित होणाऱ्या ‘गजर कीर्तनाचा’ कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणारी दीप्ती भागवत, गायिका कार्तिकी गायकवाड या दोघीही  वारीत सहभागी झाल्या आहेत. वारीमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल ‘झी टॉकीज’चे बिझिनेस हेड बवेश जानवेलकर यांनी सांगितले, “ वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. पंढरपूरची वारी हा वारकऱ्यांच्या विठ्ठलभक्तीचा सर्वोच्च बिंदू असतो. त्यांची वारी सुखकर व्हावी यासाठी ‘झी टॉकीज’ प्रयत्नशील आहेत. वारकरी विठूमाऊलीची सेवा करत असतांना, त्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळणे, ही आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे.”

०००००

सुभाष घई यांचा नवा मराठी चित्रपट ‘विजेता’


हिंदी चित्रपटसृष्टीत शो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुभाष घई ‘विजेता’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करत असल्याची घोषणा केली. गोव्यात झालेल्या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये त्यांच्या नवीन चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले. याआधी घई यांनी ‘सनई चौघडे’, ‘वळू’ आणि ‘समिता’ या तीन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘समिता’चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला होता.

खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवरूनच हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारा आहे हे लक्षात येतं. येत्या ऑगस्ट महिन्यापासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असून २४ जानेवारी २०२२ साली तो प्रदर्शित करण्याचा सुभाष घई यांचा विचार आहे. या चित्रपटात सुबोध भावे, पुजा सावंत, नेहा महाजन, पुजा बिश्त, माधव देवचके, देवेन्द्र चौगुले, गौरीश शिपुरकर, सुशांत शेलार, मानसी कुलकर्णी, कृतिका तुलसकर, ललित सावंत आणि दिप्ती धोत्रे या कलावंतांचा समावेश आहे. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अमोल शेटगे तर निर्माते राहुल पुरी आहेत. चित्रपटाचे संगीत रोहन रोहन यांचे आहे. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link