Next
वाह पुणेरी उस्ताद!
प्रतिनिधी
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this story‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’मध्ये कोण मुसंडी मारणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती. शिगेला पोचलेल्या उत्सुकतेचं उत्तर रविवारी शांताराम मनवे व परितोष पेंटर यांच्या ‘पुणेरी उस्ताद’ संघानं दिलं. पुणेरी उस्तादनं शेवटच्या टप्प्यात जबरदस्त मुसंडी मारत ‘यशवंत सातारा’ संघाची विजयी परंपरा मोडीत काढली आणि दंगल जिंकत तब्बल ५० लाखांचं इनाम जिंकलं.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडापीठ म्हणजेच महाळुंगे-बालेवाडी स्टेडियममध्ये २ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’चा महाअंतिम सामना रविवारी (१८ नोव्हेंबर) झाला. पुणेरी उस्ताद आणि यशवंत सातारा हे संघ आमने-सामने होते. पहिल्या दिवसापासून यशवंत सातारा संघानं सर्व सामने जिंकल्यामुळे त्यांचं पारडं जड होतं. मात्र काळजाचे ठोके वाढवणाऱ्या अंतिम सामन्यात पुणेरी उस्तादनं यशवंत सातारा संघाचं स्थान हिसकावून ४-२ असं दणदणीत यश मिळवलं, तर पुणेरी उस्तादचा आर्मी मॅन विनोदकुमार मॅन ऑफ द सीरिजचा मानकरी ठरला.

 

महाअंतिम फेरीपूर्वी दुसऱ्या पात्रताफेरीत पुणेरी उस्ताद संघानं विदर्भाचे वाघ संघाला ५-१नं पराभूत यशवंत सातारा संघाविरोधात शड्डू ठोकला. या पात्रता सामन्यातून, विनोद कुमारला प्लेअर ऑफ द मॅचनं गौरवण्यात आलं. महाअंतिम सामन्यात, पुणेरी उस्तादचा राहुल आवारे प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. दोन्ही सामन्यांतील, संग्राम पाटील आणि कौतुक डाफळे यांच्यातील डाव ‘फँटास्टिक फाइट ऑफ द डे’ ठरला.
बक्षीसवितरणाच्या सोहळ्यात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महत्त्वाच्या शिष्यवृत्ती जाहीर केल्या. तसंच यापुढे ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ दर वर्षी होईल आणि पुढच्या वर्षी अधिक मोठ्या स्तरावर कुस्ती दंगल आयोजित करण्याची काळजी परिषद घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. झी टॉकीज, झी मराठी, झी अनमोल आणि झी५ अॅपवर कुस्ती दंगलचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं.मान्यवरांची उपस्थिती
‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’च्या महाअंतिम सोहळ्याला एस्सेल समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष काकासाहेब पवार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, नागराज मंजुळे या संघमालकांसह सोनाली कुलकर्णी, संजय नार्वेकर, मोहसीन अख्तर, हेमंत ढोमे हे सेलिब्रिटीदेखील आवर्जून आले होते. महाअंतिम सामन्यापूर्वी गायक आदर्श शिंदे यांचा जबरदस्त परफॉर्मन्स आणि श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भाऊ कदम यांच्या कॉमेडी स्किटनं तणावपूर्ण वातावरणात हास्याची कारंजी फुलवली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link