Next
‘विकिशा’च्या लग्नसोहळ्याचा शाही थाट
--
Friday, January 11 | 01:30 PM
15 0 0
Share this story

सध्या सोशल मीडियावर एका लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हे लग्न आहे ते ‘विकिशा’चे… अर्थात विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांचे… ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेतील ‘तुला पाहते रे’मध्ये विक्रांतने ईशाला हटके पद्धतीने मागणी घातल्यानंतर या दोघांचे लग्न कसे होणार, याचीच सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. अर्थात हे लग्न शाही आणि अभूतपूर्व असणार हे तर नक्कीच. प्रेक्षकांची ही उत्सुकता लवकर पूर्ण होणार आहे. या मालिकेचा लग्नसोहळ्याचा दोन तासांचा विशेष भाग येत्या रविवारी (ता.१३) रात्री सात वाजता प्रसारित होणार आहे.
‘विकीशा’चा लग्नसोहळा मोठ्या दणक्यात आणि राजेशाही थाटात भोर येथे झाला. संगीतसमारंभदेखील शाही अंदाजात पार पडणार आहे. यावेळी ईशा आणि विक्रांत या दोघांनी ‘सैराट’च्या गाण्यावर नृत्य केले आहे. तर मायराने ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यावर जबरदस्त थिरकत या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने चारचाँद लावले आहेत. तर ‘जाऊ दे न वं’ म्हणत जयदीप आणि आईसाहेबांनी नृत्य सादर करत वाहवा मिळवली आहे. या सगळ्यांत सर्वात जास्त भाव खाऊन गेली ती ईशाची आई. ईशाच्या आईने ‘अप्सरा आली’ या गाण्यावर ताल धरून सर्वांच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ही सर्व धमाल प्रेक्षक येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या दोन तासांच्या विशेष भागात पाहता येणार आहे. ‘विकिशा’चा हा शाही संगीतसमारंभ आणि लग्नाचा दिमखादार सोहळा पाहायला विसरू नका  येत्या रविवारी, संध्याकाळी सात वाजता फक्त ‘झी मराठीवर.’

ईशासाठी खास डिझायनर
ईशाच्या प्रत्येक समारंभातील पेहराव, तिचे दागिने, तिच्या दिसण्यावर खास लक्ष देण्यात आले आहे. ईशाचे म्हणजे गायत्रीचे आऊटफिट डिझाईन क्रितिका दीक्षित हिने केले आहे, तर शाल्मली टोळे हिने स्टायलिंग केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link