Next
लपलेले शब्द
रेणू दांडेकर
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story


काही वेळा एका शब्दात खूप शब्द लपलेले असतात. म्हणजे एका मोठ्या शब्दातील अक्षरे घेऊ  आपण अनेक छोटे शब्द तयार करू शकतो. ही यादी बघा- वाचासुंदर, चमकदार, जहागीरदार, परवाना, समजावून, देशभरातून, भारतमाता, घराबाहेर, जमीनदार, वजनदार, करमरकर, मांजरेकर, सावरकर, महाराज, नकाशावाचन, इत्यादी.
उदाहरणार्थ, वाचासुंदर. यात पाहा किती शब्द लपलेत- वाचा, सुंदर, दर, चादर, वार, चावा, चार, रचा, रवा, दवा, इत्यादी.
अशा प्रकारे एका शब्दातील अनेक शब्द लिहून काढा बघू.
आणखी एक खेळ- प्रत्येक शब्दाचं एक वाक्य बनवायचं. इथे हा खेळ दोघांत खेळता येतो. एकानं शब्द द्यायचा. दुसऱ्यानं शब्दातले शब्द सांगायचे. वाक्यं भराभरा बनवायची. शब्दसाखळी हा खेळही खेळता येईल. उदाहरणार्थ, वाद. वाचा, चार, रवा, वार, रचा, चादर, दवा... यातले वेगवेगळे शब्द घेऊन वाक्यं बनवता येतील.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link