Next
केंद्रीय विद्यालय परीक्षेचे स्वरूप
फारुक नाईकवाडे
Friday, January 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

केंद्रीय विद्यालय संघटनेमधील देशभरातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक, ग्रंथपाल आणि प्राथमिक शिक्षक या पदांवरील निवडीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीची पदनिहाय शैक्षणिक अर्हता काय आहे याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या पदांसाठी वयोमर्यादा तसेच इतर अर्हता आणि पदनिहाय परिक्षापद्धती यांची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

पदनिहाय कमाल वयोमर्यादा -

१) मुख्याध्यापक - किमान ३५ व कमाल ५० वर्षे,

२) उपमुख्याध्यापक - किमान ३५ व कमाल ४५ वर्षे,

३)  पदव्युत्तर शिक्षक - कमाल ४० वर्षे, ४) प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक - कमाल ३५ वर्षे, ५) ग्रंथपाल - कमाल ३५ वर्षे, ६) प्राथमिक शिक्षक - कमाल ३० वर्षे
वयोमर्यादा शिथिल करण्याबाबतचे निकष खालील तक्त्यात विहित करण्यात आले आहेत :



या कमाल वयोमर्यादांचा लाभ एकत्रित करून घेता येत नाही. ज्या दोन संवर्गांतील वयोमर्यादांच्या शिथिलीकरणाचा लाभ उमेदवारास लागू होतो त्यातील अधिक कालावधीसाठीच्या शिथिलीकरणाचा लाभ घेता येतो. 

परीक्षा योजना : सर्व पदांसाठीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होते.

  • लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धत) - १५० गुण
  • मुलाखत - ६० गुण
लेखी परीक्षेचे स्वरूप :

मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक



पदव्युत्तर शिक्षक



प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक (इंग्रजी, हिंदी, समाजशास्त्रे, विज्ञान, संस्कृत, गणित)



प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक (शारीरिक व आरोग्यशिक्षण, कलाशिक्षण, कार्यानुभव)



ग्रंथपाल



प्राथमिक शिक्षक



सर्व विषयांचा सविस्तर अभ्यासक्रम केंद्रीय विद्यालय संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून अंतिम गुणसंख्या मोजली जाते. यामध्ये लेखी परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांना ८५:१५ अशा प्रमाणात महत्त्व देण्यात येते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link