Next
'स्वदेस' चलन
संजय जोशी
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

प्रत्येक देशाचे स्वत:चे चलनाचे मूलभूत एकक (basic unit) असते. त्याचे मूल्य कमीजास्त असू शकते. हे चलन फक्त त्या देशापुरते मर्यादित असते. परंतु अमेरिकन डॉलर मात्र याला अपवाद आहे. जगभरात डॉलर त्या त्या देशाच्या चलनात रूपांतरित करून वापरता येतो. आंतरराष्ट्रीय विनिमय दरात (exchangeable rate) स्थैर्य आणण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड – आयएमएफ) ही संयुक्त राष्ट्रांची विशेष संलग्न संस्था स्थापन करण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक या दोहोंची स्थापना करण्याच्या करारावर ४४ सदस्य देशांनी जुलै १९४४ मध्ये न्यू हँपशायरमधील ब्रेटन वूड्स परिषदेत सह्या केल्या आणि अमेरिकन डॉलरला चलन विनिमयाच्या दृष्टीने जागतिक मान्यता प्राप्त झाली.
१४९२ मध्ये कोलंबस अमेरिकेत पोहोचला आणि त्याने या जमिनीला नाव दिले ‘west indies’ कारण तो भारत शोधायला निघाला होता. तो स्पॅनिश असल्यामुळे स्पॅनिश राजाने अमेरिकेत पहिली वसाहत स्थापन केली. त्यापाठोपाठ फ्रान्सने जमिनी ताब्यात घेऊन आपापल्या वसाहती स्थापन केल्या. फ्रेंच वसाहती साम्राज्य म्हणजे १७ व्या दशकापासून ते १९६० च्या दशकापर्यंतच्या फ्रान्सच्या अधिपत्याखालील प्रदेश. १९ व्या व २० व्या शतकात हे साम्राज्य क्षेत्रफळानुसार ब्रिटिश साम्राज्यानंतरचे दुसरे साम्राज्य होते. १९२० ते १९३० या काळात या साम्राज्याने १,२३,४७,००० चौ.किमी. क्षेत्र व्यापले होते. त्यामुळेच फ्रेंच भाषा जगभर बोलली जाते. या वसाहती उभ्या करण्याचा हेतू वसाहतींमधील साधनसंपत्ती वापरून मूळ देशाची भरभराट हा होता. तोपर्यंत अमेरिकन डॉलर हे एकच चलन होते. त्यानंतर काही देशांनी एकत्र येऊन आपापल्या वसाहतींसाठी स्वतंत्र चलन आणले. आज आपण त्याचीच माहिती घेणार आहोत.

  वेस्टर्न अाफ्रिकन फ्रँक
१९५९ मध्ये नॉर्थवेस्ट अफ्रिकेमधल्या ९ फ्रेंच वसाहती (कॉलनीज) एकत्र आल्या. आणि त्यांनी ‘वेस्टर्न अाफ्रिकन फ्रँक’ हे चलन सेन्ट्रल बँक ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स म्हणजेच BCEAO या मध्यवर्ती बँकेच्या साहाय्याने समान मूल्य असलेल्या विनिमयात सुरू केले.  त्यातील प्रत्येक देशाला एक-एक सांकेतिक कोड देण्यात आला. जसा की, A- आयव्हरी कोस्ट , B- बेनिन, C-बर्किना फासो, D- माली, E- मॉरटानिया (१९८६ पर्यंत), H- नायजर, K-सेनेगल, T- टोगो, S- गिनी बिसाउ. हा कोड नोटेच्या पृष्ठभागावर छापण्यात येतो.
 
  सेंट्रल अफ्रिकन फ्रँक
९० च्या दशकाच्या सुरुवातीला मध्य आफ्रिकेतील फ्रेंच वसाहतींनी (देश) एकत्र येऊन चलनात आणि करात सुसूत्रता आणण्यासाठी ‘सेंट्रल अाफ्रिकन फ्रँक’ हे चलन आणले. ह्याही नोटांचे मूल्य समान असून ‘बँक ऑफ सेन्ट्रल आफ्रिकन स्टेट्स’ म्हणजेच BEAC या मध्यवर्ती बँकेच्या सहाय्याने त्या चलनात आल्या. त्यावर सांकेतिक कोड पुढीलप्रमाणे छापण्यात आले होते :

  ईस्टर्न कॅरेबिअन डॉलर
एकेकाळी ब्रिटिशांचे राज्य असणाऱ्या ईस्ट कॅरेबिअन देशांनी १९६५ मध्ये ‘ईस्टर्न कॅरेबिअन डॉलर’ हे स्वत:चे चलन आणले. ईस्टर्न कॅरेबिअन बँकेकडून समांतर विनिमयात या नोटा छापण्यात येतात. नोटेच्या अनुक्रमांकाच्या शेवटी सांकेतिक कोड छापला जातो. जसे, A-अँटीगुआ , D- डॉमिनिका , G- ग्रेनेडा , K- सेंट किट्टस आणि नेव्हीस , L- सेंट लुशिया , V-सेंट विन्सेंट , U- अँगुलिआ , M-मॉन्सेराट. आता छापण्यात आलेल्या काही चलनांमध्ये कोड काढून टाकण्यात आले.

  युरो
अमेरिकन डॉलरखालोखाल परकीय गंगाजळीसाठी वापरले जाणारे युरो हे जगातील दुसरे मोठे चलन आहे. युरो हे युरोपीयन समूहाच्या युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे. युरोपीयन समूहाच्या विद्यमान २८ सदस्य राष्ट्रांपैकी १९ राष्ट्रे हे चलन अधिकृतरीत्या वापरतात. १ जानेवारी २००२ रोजी युरोच्या नोटा व नाणी अधिकृतपणे वापरात आणली गेली. या नोटांवर प्रत्येक देशांच्या त्यांच्या अनुक्रमांकाच्या सुरुवातीला सांकेतिक कोड छापण्यात येतो.
                    (शब्दांकन : गौरी भिडे)n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link