Next
प्लास्टिकच्या नोटा
संजय जोशी
Friday, February 08 | 05:00 PM
15 0 0
Share this story

आपल्या भारतात प्लास्टिकबंदी झाली असली तरी जगभरात आणि काही प्रमाणात भारतातही प्लास्टिकचा वापर अजूनही आपल्याला दिसतो. क्रेडिट कार्डे अवतरली, तेव्हा त्यांना प्लास्टिकमनी म्हटले गेले. नोटा या आपल्या लेखी कागदीच असतात. परंतु जगभरात नोटांमध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो आणि अमेरिकेचा डॉलरही कागदी नसून प्लास्टिक- पॉलिमरचाच आहे... आहे की नाही गंमत?

प्लास्टिक नोटांनाच ‘पॉलिमर नोटा’ही म्हणले जाते.  आपण चलनातील नोटांबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे कागदी नोटा येतात, पण जगात कागदाशिवाय वेगवेगळ्या साहित्यापासून नोटा बनवल्या जातात. उदाहरणच द्यायचे, तर सन १८१६ ते १८६७ मध्ये रशियन अलास्का येथे सील आणि वालरस या प्राण्यांच्या त्वचेपासून, १९२३ साली जर्मनीमध्ये रेशीम वापरून, फ्रेंच मोरोक्कोमध्ये आणीबाणीच्या वेळी १९४४ मध्ये पुठ्ठ्यापासून नोटा बनवण्यात आल्या होत्या. लाकूड, चामडे आणि मखमल वापरूनही नोटा बनवण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे सगळीकडे चलनात असलेले अमेरिकन डॉलर हे कापूस आणि तागापासून बनवण्यात येत.  कालांतराने चलनातील नोटांची आवृत्ती बदलत गेली.

१९८३ मध्ये कोस्टा रिका आणि हैती यांनी सर्वप्रथम बिनकागदी नोटा चलनात आणल्या. त्यांना टायव्हेक नोटा असेही म्हणतात. या नोटा संयोगक्रियेद्वारा (synthetic  material ) बनवल्या होत्या.  हीच नोट पुढे एका ब्रिटिश बेटावर ब्राडवेक या नावाने छापण्यात आली. परंतु तेथील उष्णकटिबंधीय हवामानामुळे नोटांवरील शाई घट्ट राहिली नाही आणि त्या नोटांमधून धूर येण्यास सुरुवात झाली.  त्यामुळे १९८८ मध्ये या नोटांवर बंदी घालून त्या स्थगित करण्यात आल्या.

पॉलिमर नोटांचा इतिहास
१९६७ साली ऑस्ट्रेलियामध्ये १० डॉलरच्या बनावट नोटांच‍ी समस्या उभी राहिली.  हा तोच काळ होता जेव्हा नुकताच छायाप्रतीच्या यंत्राचा (photocopier  machine ) शोध लागला होता. या नकली नोटांची समस्या सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलियातील लोकांनी पॉलिमरपासून (प्लास्टिक)  नोटा बनवण्याचा आणि छापण्याचा विस्तृत अभ्यास केला.  त्याच संशोधनातून १९८८ साली त्यांनी पहिली पॉलिमर नोट चलनात आणली.

पॉलिमर नोटांचे अनेक फायदे आहेत, जसे :
  •      पॉलिमर नोटेची निर्मिती कठीण असते, त्यामुळे नक्कलही कठीण ठरते.
  •      प्लास्टिक नोटांचे आयुष्य पेपर नोटांपेक्षा तिप्पट असते.
  •  या नोटा पेपर नोटांच्या तुलनेत स्वच्छ ठेवण्यास सोप्या असतात. त्या धुताही येतात.
  •      पॉलिमर नोटांना अनेक सुरक्षावैशिष्ट्ये असतात.
  •      या नोटा कागदी नोटांपेक्षा जास्त आकर्षक असतात.
  •      या नोटा रिसायकल करून याचे छर्रे बनवले जातात.
  •      प्लास्टिक नोटा वजनाने खूप हलक्या असतात.          
      १९९० पासून  सिंगापूर, पापुआ न्यू गिनी, ब्रुनेई या आणि अशा अनेक देशांमध्ये पॉलिमर नोटा चलनात आल्या. उरुग्वे या देशाने तसेच अन्य ६५ देशांनी अलिकडेच पॉलिमर  नोटा चलनात आणल्या आहेत.  त्याचबरोबर बर्म्युडा, मोरक्को, कझाकस्तान, रशिया या देशांनी हायब्रिड पॉलिमर म्हणजे प्लास्टिक आणि कागद वापरून नोटा चलनात आणल्या आहेत.काही मनोरंजक आणि स्मरणात राहिलेल्या पॉलिमर नोटा 
  •      बर्म्युडाच्या मौद्रिक प्राधिकरणाच्या ४०व्या वर्धापनादिनानिमित्त चलनात आणलेली २ डॉलरची हायब्रिड पॉलिमर नोट.
  •      सूर्यग्रहणाच्या स्मरणार्थ २००० साली रोमानिया येथे चलनात आणलेली २००० लायची नोट.
शब्दांकन : गौरी भिडे

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link