Next
अहिल्याबाई होळकर
- विजय काळे (संस्कार भारती)
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सरदार मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. १७६६ मध्ये त्यांचे निधन झाल्यावर त्यांचा पुत्र मालेराव याला सुभेदारीची वस्त्रे मिळाली, परंतु लवकरच त्यांचेही देहावसान झाले. मालेरावांना मूलबाळ नव्हते, त्यांच्या पत्नी, मल्हाररावांच्या सूनबाई, अहिल्याबाई होळकर यांच्यावर जहागिरीची मोठी जबाबदारी येऊन पडली. मालेरावांना वारस नसल्याने त्यांच्या काही दरबारी मंडळींनी त्यांनी राघोबादादांना दत्तक घ्यावे अशी मागणी केली आणि राघोबादादांना जहागिरी ताब्यात घेण्याबद्दल सुचवले.
राघोबादादांच्या मदतीने अहिल्यादेवींना राज्यकारभारातून बाहेर करायचे असा त्यांचा प्रयत्न होता. राघोबादादा तातडीने सैन्य घेऊन इंदूरकडे निघाले. हे अहिल्यादेवींना कळताच त्यांनी दत्तकाची मागणी फेटाळून सर्व सत्ता स्वतःच्या हाती घेतली. त्यांनी सर्व सरदारांना मदतीचे आवाहन केले आणि त्याचबरोबर स्त्रियांची एक स्वतंत्र पलटण उभी केली.
त्यांचा पुतण्या तुकोजीराव होळकर याने सैन्याचे नेतृत्व केले. राघोबादादांना अहिल्याबाईंनी निरोप पाठवला. “माझे राज्य हिरावून घ्यायला आपण सैन्य घेऊन आला आहात... पण मी अबला आहे, असहाय्य आहे, या भ्रमात राहू नये... मी भाला घेऊन उभी ठाकले, तर तुमचे मनसुबे जागीच जिरतील. माझ्या अधिपत्याखाली स्त्रियांची फौज तुमच्याशी लढेल. मी हरले तर मला कोणी हसणार नाही; पण आपण हरलात तर जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही.” शेवटी राघोबांनी माघार घेतली. नंतर अहिल्याबाईंनी इंदुरात त्यांचा उत्तम पाहुणचार केला.
पुढील अठ्ठावीस वर्षे अहिल्याबाईंनी राज्यकारभाराचा गाडा अतिशय कुशलपणे चालवला. तिजोरीत भर घालत त्यांनी प्रजाहिताकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या धर्मपरायण आणि उदारवृत्तीमुळे अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link