Next
UPI अॅप वापरताना...
अमृता दुर्वे
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

हल्ली एखादी वस्तू घेतली की पैसे भरण्यासाठी युपीआय अॅप वापरणं खूप सोपं ठरतं. यामुळे ही अॅप्स फार लवकर लोकप्रिय झाली. पण गेल्या काही दिवसांमध्ये याच युपीआय अॅपद्वारे फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. म्हणूनच युपीआय अॅप्स वापरताना या काही गोष्टी लक्षात ठेवा.

कोड कधी द्यायचा?

आपल्यापैकी बहुतेक जण भारत इंटरफेस फॉर मनी – (भीम / BHIM), गुगल पे, फोन पे ही विविध युपीआय – युनिफाईड पेमेंट इंटरफेस अॅप्स वापरतात. या अॅपच्या मार्फत पैसे स्वीकारता येतात किंवा कोणालाही पाठवता येतात. पण त्यासाठीचा व्यवहार करताना थोडी काळजी बाळगणं गरजेचं आहे. कारण पैसे भरण्यासाठी – पेमेंटसाठी आणि पैसे स्वीकारण्यासाठी – रिसिव्हिंगसाठीचा पर्याय निवडताना त्यात फक्त एका स्वाईपचा फरक आहे. डावीकडे स्वाईप करून पैसे स्वीकारा आणि उजवीकडे स्वाईप करून पैसे भरण्याचा पर्याय निवडता येतो. पैसे स्वीकारण्यासाठी ‘पिन’ नंबर लागत नाही. पैसे भरण्यासाठी पिन नंबर लागतो. म्हणूनच जर कधी तुम्ही तुमच्याकडील वस्तूंची ऑनलाइन विक्री करण्यासाठी OLX सारख्या साइट्स वापरत असाल तर व्यवहार लक्षपूर्वक करा. अनेकदा आपल्याला वस्तू घेण्यात स्वारस्य आहे असं भासवत ही वस्तू विकणाऱ्यांचे पैसेच पळवले जातात. ही अनोळखी व्यक्ती तुम्हाला युपीआयसाठीची रिक्वेस्ट पाठवल्याचं सांगून ती स्वीकारायला सांगते. पण तुम्ही जर का अशी कलेक्ट रिक्वेस्ट स्वीकारलीत तर तुम्हाला पैसे मिळण्याऐवजी तुमचेच पैसे जातील. म्हणून अनोळखी व्यक्तींसोबत युपीआयवरून व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आणि त्यासाठी वापर केला जातो या पिन नंबरचा.  म्हणूनच तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसणाऱ्या व्यक्तीकडून अशी रिक्वेस्ट आली तर त्या व्यक्तीला ब्लॉक करा. किंवा खात्री करूनच मग पुढचा व्यवहार करा. अनोळखी नंबर्सवरून ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ स्वीकारू नका. सगळी युपीआय अॅप्स ही त्यांच्या युजर्सना स्पॅम वॉर्निंग्स देत असतात. त्याकडे लक्ष द्या.
फोनचा अॅक्सेस कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. तुमच्या अॅपमध्ये असलेला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जर कोणी तुम्हाला फोन करून एनी डेस्क (AnyDesk) किंवा Teamviewer, ScreenShare सारखी अॅप्स डाऊनलोज करायला सांगितली, तर तसं करू नका. या अॅपमुळे तुमच्या फोनचा ताबा पूर्णपणे एखादी तिसरी व्यक्ती घेऊ शकते आणि तुमचा डेटा चोरू शकते. अनेकदा कंपन्यांचे टेक्निशियन्स या स्क्रीन शेअरिंग अॅप्सचा वापर अडचणी सोडवण्यासाठी करतात, पण याचाच वापर करून तिऱ्हाईत व्यक्ती तुमचा डेटा चोरू शकते.  यासोबतच प्ले स्टोअरमधून युपीआय अॅप डाऊनलोड करताना तुम्ही योग्य अॅप डाऊनलोड करत आहात त्याची खात्री करून घ्या. अशी पेमेंट आणि बँकिंग अॅप्स अॅक्सेस करण्यासाठी पासवर्ड ठेवा. म्हणजे फोन कोणाला सापडल्यास ती व्यक्ती ही अॅप्स वापरू शकत नाहीत.
तुम्हाला जर कोणी फोन करून काही विशेष ऑफर सांगितली, काही मेसेज पाठवायला सांगितला, तर तसं करू नका. किंबहुना एखाद्या कॉलविषयी शंका आल्यास ताबडतोब कॉल कट करा. आणि त्या युपीआय अॅपच्या हेल्पलाईनला फोन करताना गुगलवरून तो नंबर न शोधता, अॅपमध्ये देण्यात आलेल्या फोनवर किंवा त्यांच्या वेबसाइटवरून मिळालेल्या फोनवर कॉल करा. कोणताही व्यवहार करताना अडचण आली तरी तुमचं बँकिंग लॉग-इन आणि पासवर्ड शेअर करू नका.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link