Next
अलघोजा
मोहन कान्हेरे
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this storyया वाद्याचं नावही तुम्ही ऐकलं नसेल. लाकूड वापरून बनवलेली उपकरणांची जोडी म्हणजे हे वाद्य होय. बलुचिस्तान, सिंध, कच्छ, राजस्थान व पंजाब या प्रांतांत हे वाद्य प्रचलित आहे. मरियन, नृही, दो नाली, दोनल, गिरव, सातारा, नागेज अशी या वाद्याची इतर नावं आहेत. दोन परस्परपूरक बासऱ्यांच्या (चोच असलेल्या) संयोग म्हणजे अलघोजा! एकाच वेळा दोन्ही वाजवल्या जातात. ही फारच अवघड गोष्ट आहे. प्रत्येक मात्रेवर झुलती लय उत्पन्न करून आवश्यक परिणाम साधला जातो, जो लोकसंगीताला उपयुक्त ठरतो. सुरुवातीला दोन्ही बासऱ्या समान लांबींच्या होत्या, पुढे आवश्यकता वाटली व एक बासरी थोडी आखूड केली गेली. काही कलाकार सोयीचं वाटल्यामुळे दोन बासऱ्या एकत्र बांधून घेतात व वादन करतात.
उस्ताद खामिसू खान, मिश्री खान जमाली, अकबर खामिसू खान, गुरमीन बाबा अशा काही वादककलाकारांची नावं आहेत.
टोम्बा नावाच्या वाद्याच्या जोडीला अलघोजा (अलगोजा) वाजवणारा कलाकार दाखवणारा एक फोटो यूट्यूबवर आपण पाहू शकतो. त्यांची नावं फोटोच्या खाली दिलेली नाहीत. मुंबईतल्या एका ट्रेडफेअरमध्ये पंजाबच्या मोठ्या स्टॉलवर काही पंजाबी वाद्यं मांडून ठेवली होती, त्यात हे वाद्य पाहायला मिळालं होतं. मात्र ते वाजवणारा कलाकार तिथे उपलब्ध नव्हता.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link