Next
काय बोलू? काय लिहू?
- रेणू दांडेकर
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

कधी कधी एखाद्या विषयाबद्दल सलग ४-५ ओळीही आपल्याला लिहिता किंवा बोलता येत नाहीत. अचानक कुणीतरी काहीतरी विचारतं नि आपण जेमतेम एखाद्या शब्दात, एखाद्या वाक्यात उत्तर देऊन मोकळे होतो. समोरचा आपल्याला सुचवतोही ‘अजून काहीतरी सांग ना.’ एखाद्या विषयावर आपल्याला किमान ५-६ वाक्यं बोलता, लिहिता यावीत यासाठी काही सराव कसा करायचा ते पाहूया.
आज वेगवेगळ्या प्रकारची वाक्यं दिली आहेत. रिकाम्या जागी शब्द काय घालायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. फक्त त्या शब्दाशी संबंधित सर्व वाक्यं तयार करायची आहेत. शब्द तुम्ही तुमच्या मनानं घ्या. उदाहरणार्थ, शाळा, आई, बाग, ताई, मावशी, आत्या, मित्र, दादा, मामा, एखादा प्राणी, पक्षी, खेळणं, वस्तू काहीही...

१)    ही माझी ________ आहे. माझ्या ________ नाव ________ आहे. ________ मी खूप मज्जा करतो. आम्ही ________ आल्यावर ________ म्हणतो. मग ________ सुरुवात करते. ________ आम्ही खेळतो. ________ म्हणून आम्ही ________ जातो. ती मला ________.

२)    हा माझा ________. त्याच्याशिवाय मला________. आम्ही दोघं खूप ________. मी त्याला माझ्या ________. नवे कपडे घातले की मी ________. मग त्याला खूप ________.

३)    पुस्तक म्हणजे ________. पुस्तकातून मला ________ वाचायला मिळतात. पुस्तकात खूप छान छान ________ असतात. पुस्तकात मी ________. पुस्तक म्हणजे आपला ________. पुस्तक वाचून झाले तरी मी ________. मी पण आता पुस्तक ________.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link