Next
झेविअर्सचा ‘लिंग्वा फेस्टिवल’
प्रतिनिधी
Friday, November 30 | 05:48 PM
15 0 0
Share this storyसेंट झेवियर्स कॉलेजच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच ‘लिंग्वा फेस्टिवल’ आयोजित केला होता. या फेस्टिवलमध्ये नाटकं, कविता, संगीत, नृत्य अशा कार्यक्रमांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, हर्षदा खानविलकर, श्रेयस तळपदे यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी महोत्सवाला हजेरी लावली. तसंच इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उपस्थिती लावून झेविअर्सच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘सम्राट अशोक’ या हिंदी नाटकानं  प्रेक्षकांची मनं जिंकली. हिंदी कथांच्या अभिवाचनाचाही एक कार्यक्रम या महोत्सवात सादर झाला. तसंच कनिष्ठ महाविद्यालयाचा हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

‘लिंग्वा फेस्ट’च्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस ‘फॅमिली डॉट कॉम’ हे हृदयस्पर्शी मराठी नाटक सादर करण्यात आलं.

‘फॅमिली डॉट कॉम’ हे नाटक युवा पिढीची होणारी भावनिक घुसमट आणि त्यामुळे त्यांनी शोधलेल्या व्हर्चुअल जगातील पळवाटा यावर आधारित होता. सुमित राघवन यांनी आपल्या भाषणातून पालक आणि मुलांमध्ये संवाद होणं अत्यंत गरजेचं आहे, असा संदेश दिला. तसंच आपण आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगायला हवा असा उपदेश करत, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गाण्याने त्यांनी  भाषणाचा समारोप केला.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात लावणीनं झाली. लावणीच्या सदरीकरणामध्ये झालेले बदल ही या लावणी कार्यक्रमाची थीम होती. सोनाली कुलकर्णी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. पोवाडा  हा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकारसुद्धा या महोत्सवात सादर करण्यात आला. ‘कत्ल’ ह्या हिंदी नाटकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.कार्यक्रमाचा दुसरा दिवस कविताप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरला. प्रसिद्ध इंग्रजी कवयित्री अरण्या जोहर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवितावाचनाचा कार्यक्रम पार पडला. ‘The Breakfast Club’ या इंग्रजी चित्रपटाने या दिवसाचा समारोप करण्यात आला.

अतिशय मनोरंजक अशा या महोत्सवाने उपस्थितांची मनं जिंकली.

तिसऱ्या दिवशी ‘ब्लाइंड बुक एक्झिबिशन’ आयोजित करण्यात आलं होतं. मुलांनी आपल्याकडील जुनं पुस्तक आणायचं आणि दिलेला ‘क्लू’ ओळखून नवीन पुस्तक शोधायचं, असा ‘ट्रेझर हंट’सारखा हा एक अनोखा खेळ होता.

याच दिवशी ‘व्हॉटएव्हर हॅपन्ड टू सोफिया’ हे इंग्रजी नाटकही यावेळी मुलांनी सादर केलं. दिवसाचा समारोप ‘लकीर’ या हिंदी संगीतनाटकाने करण्यात आला.
हिंदीतून संवाद, मराठीतून काही खेळ, ‘आर्टिफिशियली यूवर्स’ आणि ‘सुधा अँड राहुल’ ही इंग्रजी नाटकंदेखील यावेळी सादर झाली. हिंदी अंताक्षरी आणि बॉलीवूड क्विझ या कार्यक्रमांनी  महोत्सवात रंगत आणली.

या महोत्सवात तिन्ही भाषांतील कार्यक्रमांची रेलचेल होती. सर्व विद्यार्थी तीनही भाषांतील कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link