Next
‘वॉर’ची घसघशीत कमाई
प्रतिनिधी
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this storyगांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५३.३५ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या दिवशी इतकी मोठी कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे मुख्य भूमिकेत आहेत.
गांधीजयंतीला असलेली सुट्टी लक्षात घेऊन  निर्मात्यांनी या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा अंदाज अतिशय योग्य ठरला. हा चित्रपट देशभरात ४०० चित्रपटगृहांत दाखवण्यात आला. या चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल समीक्षक तरन आदर्श यांनी सांगितलं, की राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झाल्याचा मोठा फायदा वॉर चित्रपटाला मिळाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करण्याचा मानही या चित्रपटाला मिळाला आहे. तसंच सर्वाधिक कमाई करणारा हृतिक रोशनचाही हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान,‘वॉर’ चित्रपटाला चित्रपटगृहांत मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी काही दिवसांत हा चित्रपट ३०० कोटींचा व्यवसाय करेल, असा अंदाजही जाणकारांनी वर्तवला जात आहे.अक्षय करतोय बच्चन पांडे
हिदी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक व्यग्र अभिनेता म्हणून अक्षयकुमारची ओळख आहे. ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार असून याचे चित्रीकरण पुढील वर्षीपासून सुरू होणार आहे. अक्षयची यात प्रमुख भूमिका आहे. ‘वीरम’ या तामिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटात अक्षयची हिरॉईन कृतिका सेन असेल. या दोघांबरोबर तमन्ना भाटिया हिची मध्यवर्ती भूमिका आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांची असून हा चित्रपट पुढील वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याच काळात आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link